रे रोडवर ट्रकच्या इंधन टाकीचा स्फोट; एक ठार तर एक जखमी

 Reay Road
रे रोडवर ट्रकच्या इंधन टाकीचा स्फोट; एक ठार तर एक जखमी
Reay Road, Mumbai  -  

रे रोडच्या बॅरिस्टर नाथ पै मार्गावर मंगळवारी दुपारी वेल्डिंगचं काम सुरू असताना पालिकेच्या क्लिन-अप ट्रकच्या इंधन टाकीचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात वेल्डरचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक क्लिनर गंभीर जखमी झाला आहे.

मंगळवारी दुपारी बॅरिस्टर नाथ पै मार्गावरील एका गॅरेजमध्ये क्लिन-अप ट्रकचे वेल्डिंगचे काम सुरू होते. ट्रकच्या खाली वेल्डिंग सुरू असताना अचानक इंधन टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, वेल्डिंग करणाऱ्या अब्दुल रहमान यांचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर सिराज अहमद 80 टक्के भाजले असून, त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

 या प्रकरणी काळाचौकी पोलीस स्टेशनचे पोलीस सध्या गॅरेज मालकाकडे चौकशी करत आहेत.

Loading Comments