सोशल मीडियावर फोटो टाकताय? मग असं तुमच्यासोबतही घडू शकतं!


सोशल मीडियावर फोटो टाकताय? मग असं तुमच्यासोबतही घडू शकतं!
SHARES

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे आपल्याला काहीही सांगायचे असेल किंवा आपला एखादा मस्त फोटो असेल तर तो सर्वात आधी आपण सोशल मीडियावर टाकतो. पण हे करताना जरा काळजी घ्या. कारण अशाच प्रकारे नवीमुंबईत राहणाऱ्या बिपीन पांडे उर्फ बाबा याने आपला एक फोटो सोशल मीडियावर टाकला. पण ते त्याच्या असे अंगलट आले की, तो सध्या जेलची हवा खात आहे.

बिपीनला का झाली शिक्षा?

नवी मुंबईत राहाणाऱ्या बिपीन पांडे उर्फ बाबा याचे तिथेच एक हॉटेल आहे. केटरिंग सर्व्हिसेस बरोबर सिक्युरिटीचा देखील या बाबाचा व्यवसाय आहे. पाच जून रोजी तो अलाहबादला आपल्या साखरपुड्यासाठी गेला होता. तिथे त्याने 20,000 रुपयांना एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूस विकत घेतली. ही पिस्तूल घेऊन तो मुंबईत आला आणि इथे पिस्तूल घेऊन चमकोगीरी करू लागला. इथल्या काही बारमध्ये हा बिपीन ही पिस्तूल कंबरेला खोचून फिरत असे. त्याचदरम्यान सोशल मीडियावर पिस्तुलासह एक फोटो देखील त्याने टाकला. काही दिवसानंतर हा फोटो गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे पोहचला तोच पोलिसांनी त्याचा छडा लावण्यास सुरुवात केली. त्यांना खबऱ्याकडून या बिपीनबद्दल समजले आणि चेंबूरमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत 7.65 बोरची पिस्तूल खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना सापडली. पण, त्यासोबत कोणताही परवानाच आढळून न आल्याने गुन्हे शाखेने त्याला हत्यार कायद्याअंतर्गत अटक केली आणि कोर्टात हजार केले. सध्या कोर्टाने त्याला 27 तारखेपर्यंत खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे असे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड करताना जरा जपून. कारण सोशल मीडियावरही पोलिसांची नजर आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय