महिला चोर जेरबंद


SHARE

कुर्ला - गर्दीच्या वेळेस महिला ड्ब्यामध्ये घुसून मोबाईल आणि सोनसाखळी लांबवणाऱ्या एका महिलेला सोमवारी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. निर्भया पथकातील काही पो.ह. सुमन तळपडे, विद्या देशमुख, पो.शि. भारती बागुल ह्या कुर्ला रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म ७ वर महिला आरक्षित डब्याजवळ पाळत ठेवुन होत्या. याच दरम्यान महिला प्रवासी सरीन खान (२६) सायंकाळी सातच्या सुमारास कुर्ला प्लॅटफॉर्म न. ६ वरुन पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढत असताना आरोपी महिला फरजाना शेख (३५) हीने त्यांची पर्सची चैन खेचून १३,५०० रुपयांचा मोबाईल चोरला. त्याच वेळी महिला पोलिसांनी फरजाना शेख हिला रंगेहाथ पकडले. फरजाना ही सराईत गुन्हेगार असून कुर्ला पोलिसांनी या महिलेला वडाळा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या