वाहतूक पोलीस की हप्तेखोर?

मुंबई - वाहतूक पोलीस विभागातील भ्रष्टाचार पोलीस शिपायानेच उघडकीस आणला आहे.

सुनील टोके असे या पोलीस शिपायाचे नाव असून, त्याने वाहतूक पोलीस विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आणि याबाबत त्याने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. 23 जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे. सुनील टोके हे वाहतूक पोलीस विभागात असताना त्यांची तब्येत खराब झाली होती. त्यामुळे त्यांनी त्यांची बदली घराच्या आसपास करायला सांगितली. मात्र यासाठी त्याच्या वरिष्ठांनी त्याच्याकडे 40,000 हजार रुपये मागितले आणि जेव्हा त्याने याला नकार दिला तेव्हा त्याच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्याने वरिष्ठांवर केला.

Loading Comments