PMC घोटाळा: वाधवा बंधूंना १४ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांनी किल्ला कोर्टासमोर जोरदार निदर्शने केली. आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

PMC घोटाळा: वाधवा बंधूंना १४ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

पंजाब आणि महाराष्ट्र को-आॅपरेटीव्ह बँकेत ४३५५ कोटी रुपयांचा घोटाळा करणारे हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड' (HDIL) चे प्रर्वतक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांच्यासहीत चेअरमन वरियम सिंग यांना १४ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

दरम्यान पीएमसी बँकेच्या ठेवीदारांनी किल्ला कोर्टासमोर जोरदार निदर्शने केली. पीएमसी बँक, आरबीआय चोर है, अशा घोषणाही त्यांनी दिल्या. आरोपींना न्यायालयात मागच्या दाराने आत आणण्यात आलं. त्याआधी वाधवाच्या गाडीवर लाथा मारून, बाटल्या फेकून आंदोलनकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला. पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली. आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. 

काय आहे घोटाळा?

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेतील ४ हजार ३३५ कोटींच्या या घोटाळ्याप्रकरणी १० पेक्षा अधिक आरोपींवर सोमवारी गुन्हा दाखल केला होता. पीएमसी बँकेच्या अधिकारी आणि संचालकांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावधीत भांडुपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांतील मोठ्या कर्जांची परतफेड होत नसतानाही ती खाती रिझर्व्ह बँकेपासून लपवली होती. हा सर्व गैरव्यवहार करण्यात ‘एचडीआयएल'चा पुढाकार होता. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून घोटाळा केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. 

मुंया प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं आहे. पोलिसांनी वाधवा कुटुंबाची ३ हजार ५०० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली असून, त्यात आलिशान बंगले, कार आणि स्पीड बोटचा समावेश आहे.   



हेही वाचा-

पीएमसीच्या माजी अध्यक्षाला अटक, गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे छापे

पीएमसी बँकेची एचडीआयएलवर कर्जाची खैरात, दिलं 'एवढं' प्रचंड कर्ज



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा