पोलिसांची कारवाई सुरूच, राज्यात ९६ हजार वाहने केली जप्त

पोलिसांची कारवाई सुरूच, राज्यात ९६ हजार वाहने केलीत जप्त

पोलिसांची कारवाई सुरूच, राज्यात ९६ हजार वाहने केली जप्त
SHARES

राज्यासह मुंबईत कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यावश्य
क सेवा या दिवस रात्र प्रयत्न करत असताना अनेक ठिकाणी नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करत विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बेजबाबदार नागरिकांवर पोलिसांनी कलम १८८ नुसार  २ लाख ६२ हजार गुन्हे दाखल केले आहेत. तर आतापर्यंत ९६ हजार १७२ जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 हेही वाचाः-भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना संसर्गाचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत असताना, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र अद्याप काही जणांना परिस्थितीचं गांभीर्यच कळालेलं दिसत नाही. अशा बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना फोफावण्यात मदत होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी अशा बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यानुसार राज्यात  लॉकडाऊनच्या  काळात म्हणजेच २२ मार्च ते २० सप्टेंबर  या कालावधीत  कलम १८८ नुसार  २, ६२,२२० गुन्हे नोंद झाले असून ३५,७९५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अनेकदा कारवाई करताना पोलिसांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत.  अशा हल्लेखोरांविरुद्ध  पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ८९४ घटना घडल्या आहेत.

हेही वाचाः-मनसेच्या नेत्यांचा बेकायदा लोकल प्रवास.!

या  लॉकडाऊनच्या काळात नागरिक सर्वाधिक मदतीसाठी पोलिसांच्या १०० नंबर या नियंत्रण कक्षाकडे फोन करून मदत मागत आहेत. अशा १ लाख १३ हजार मदतीचे फोन आले असून त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.  तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८६८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती देशमुख यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय