वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील दरोडेखोरांना अटक, चौघांना बेड्या

ही टोळी एकट्याने कार चालवणाऱ्याला हेरायचे आणि त्यांना लुटायचे.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील दरोडेखोरांना अटक, चौघांना बेड्या
SHARES

मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लुटमार (Western express Highway) करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी (Mumbai Police) मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी एकट्याने कार चालवणाऱ्याला हेरायचे आणि त्यांना लुटायचे. याप्रकरणी पोलिसांनी (Mumbai Crime News) मोठी कारवाई करत अखेर चौघांना गजाआड केलंय.

मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लुटमार झाल्याच्या एका घटनेची तक्रार पोलिसांकडे आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली.

आरोपी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवतात आणि महामार्गावर एकटे जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करतात, त्यानंतर महामार्गावरील निर्जन ठिकाणी ओव्हरटेक करून कार थांबवतात आणि लुटून पळून जातात, असा आरोप करण्यात आलाय.

लुटमार करण्याच्या उद्देशाने दरोडेखोर ओला कारमध्ये फिरायचे. ओला कारमध्ये फिरुन वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेरुन एकट्याने जाणाऱ्या कारला ओव्हरटेक करायचे. त्यानंतर कार थांबवायला लावून मौल्यवान मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू सोबत ठेवणाऱ्याला लुटायचे. नुकतेच या टोळीने सोन्याचे दागिने लुटून पळ काढला होता.

25 मे रोजी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील मेट्रो मॉलजवळ दरोडेखोरांनी एका व्यक्तीची सोनसाखळी आणि आयफोन 13 प्रो हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तपास सुरू करून चार आरोपींना मीरा भाईंदर येथून अटक केली.



हेही वाचा

मुंबई पोलिसांच 'ऑपरेशन मुस्कान', जाणून घ्या मोहिमेसंदर्भात सर्व माहिती

Sakinaka Rape-Murder Case : साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा