संतापजनक !अश्लील व्हिडिओद्वारे तरुणीला करत होता ‘ब्लॅकमेल’,

तरुणीच्या नकळत अश्लील व्हिडिओ ही रेकाॅर्ड केला होता. त्यानंतर अचानक तरुणी एड्स हा गंभीर रोग असल्याची अफवा पसरवत तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला

संतापजनक !अश्लील व्हिडिओद्वारे तरुणीला करत होता ‘ब्लॅकमेल’,
SHARES

लग्न करण्यासाठी योग्य जोडीदार मिळावा असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकदा मुलांना समजून घेण्यासाठी मुली त्या मुलाच्या संपर्कात राहतात, मात्र मुलींच्या याच साधेभोळे पणाचा अनेक मुल फायदा घेतात. नेहरूनगरमध्ये एका तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कुणाला सांगितल्यात तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली. ऐवढ्यावरच न थांबता अत्याचाराचा व्हिडिओ मुलीच्या बापाला पाठवून तिला एड्स हा गंभीर रोग असल्याचा खोटा प्रचार नराधमाने केला.

हेही वाचाः-  येस बँकेतील गैरव्यवहारामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे मिळण्यात अडचण


नेहरूनगरमध्ये राहणारी ३० वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत कामाला आहे. काही दिवसांपूर्वी तरुणीच्या वडिलांनी  तिच्यासाठी आरोपी मयूर मेहताचे स्थळ सुचवले होते. त्यानुसार तरुणीचे वडिल मयूरच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले. त्यावेळी मयूरने तरुणीला समजून घेण्यासाठी वेळ मागितीला. त्यानंतर मयूर आणि पीडित तरुणी एकमेकांच्या संपर्कात आले. ६ महिन्यानंतर मयूरने तरुणीला नकार दिला. त्यानंतर पून्हा ४ महिन्यानंतर त्याने तरुणीशी पून्हा संपर्क साधून लग्नाला होकार दिला. याच दरम्यान तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून मयूरने तिच्याशी संबध ठेवले. त्यावेळी त्याने तरुणीच्या नकळत अश्लील व्हिडिओ ही रेकाॅर्ड केला होता. त्यानंतर अचानक तरुणी एड्स हा गंभीर रोग असल्याची अफवा पसरवत तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. 


हेही वाचाः- मुंबई इंडियन्सचे सामने होणार महाराष्ट्राबाहेर?

ऐवढ्यावरच न थांबता तरुणीची बदनामी करण्यासाठी त्याने तरुणीच्या न कळत काढलेला तो व्हिडिओ पीडितेच्या वडिलांना पाठवला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्याची धमकी वारंवार देऊ लागला. त्यावेळी तरुणी पोलिसांची मदत घेत असल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिला रेल्वे खाली जिवे मारण्याची किंवा तोंडावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली. दिवसेंदिवस मेहताचा त्रास वाढू लागल्यानंतर तरुणीने मोठ्या हिंमतीने नेहरूनगर पोलिसात तक्रार नोंदवली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मयुर मेहता विरूद्ध ३७६(एन), ३५४,३५४(ड), ५००,५०४,५०६ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलिस अधिक तपास करत आहेत. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा