सहारा स्टारमध्ये ४२ जुगाऱ्यांना अटक!


सहारा स्टारमध्ये ४२ जुगाऱ्यांना अटक!
SHARES

मुंबईच्या सहारा स्टार या पंचतारांकीत हाॅटेलमध्ये जुगार खेळणाऱ्या ४२ जणांना मंगळवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. आरोपींपैकी ५ जण सराईत बुकी असल्याचं समोर अालं अाहे. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण १७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

रोकड, दारू जप्त

सहारा स्टार या पंचतारांकीत हाॅटेलमध्ये काही जण जुगार खेळण्यासाठी अाल्याची माहिती माहिती गुन्हे शाखा ८ च्या पोलिसांना मिळाली होती.  त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हाॅटेलमध्ये चौकशी केली असता एका व्यक्तीने हाॅटेलमधील ७ रुम बुक केल्याचं अाढळून अालं. पोलिसांनी या ७ रूममध्ये तपासणी केली असता २ रुममध्ये ४२ जण फ्लॅश हा जुगार खेळत होते.

या सर्वांना अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी १६ लाख २४ हजार ३२५ रुपये हस्तगत केले. त्याचबरोबर २७ हजार ६६२ रुपये किंमतीचे जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य आणि १ लाख रुपयांच्या महागड्या स्काॅच व्हिस्कीच्या बाटल्या हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली.



हेही वाचा -

काॅसमाॅस बँक हॅकिंग प्रकरण: मुंबई सायबर सेल पुणे पोलिसांच्या मदतीला

उत्तन समुद्र किनाऱ्यावरील हाॅटेलमध्ये रेव्ह पार्टी; पोलिसांचा छापा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा