काॅसमाॅस बँक हॅकिंग प्रकरण: मुंबई सायबर सेल पुणे पोलिसांच्या मदतीला

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईत सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञान आहे. त्याच बरोबर मुंबई पोलिस अधिकारी हे सायबर गुन्हे व्यवस्थितरित्या हाताळत आहेत. त्या तुलनेत पुणे पोलिस तितकेसे प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिस संयुक्तरित्या करत आहेत.

काॅसमाॅस बँक हॅकिंग प्रकरण: मुंबई सायबर सेल पुणे पोलिसांच्या मदतीला
SHARES

नवी मुंबईतील वाशी येथील एमजीएम रुग्णालयातील माहिती चोरून रुग्णालय प्रशासनाकडे खंडणी मागणाऱ्या सायबर चोरट्यांनी आता पुण्यात धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील काॅसमाॅस बँकेचं सर्व्हर हॅक करून या सायबर चोरट्यांनी ९४ कोटींची लूट केली आहे. लुटीचे हे पैसे हाँगकाँग या देशात वळवण्यात आल्याचं प्राथमिक माहितीतून पुढं आलं आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पुणे पोलिस मुंबईच्या सायबर सेलमधील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मदत घेणार आहेत.  

'अशी' झाली चोरी

पुण्यातील गणेश खिंड इथं काॅसमाॅस बँकेचं देशातील मुख्य कार्यालय आहे. ११ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता चोरट्यांनी काॅसमाॅस बँकेच्या एटीएम (स्विच) सर्व्हरवर मालवेअर साॅफ्टवेअरद्वारे हल्ला केला. बॅकेतील व्हिजा आणि रुपी डेबिट कार्डची माहिती चोरून त्याद्वारे १२ हजार ट्रान्जेक्शन केले. या व्यवहारातून ७८ हजार कोटी रुपयांची रक्कम चोरट्यांनी हाँगकाँग इथं वळवली. त्यानंतर २८४९ ट्रान्जेक्शन करून सायबर चोरट्यांनी २ कोटी ५० लाख रुपये भारतात वळवले.  



एकूण १४ ८४९ ट्रान्जेक्शन करत ८० कोटी ५० लाख चोरले. त्यानंतर १३ आॅगस्ट रोजी दुपारी ११.३० वा. च्या सुमारास बॅकेतील स्विफ्ट ट्रान्झॅक्शन इनिशिएट करून हाँगकाँग येथील ए.एल.एम ट्रेड्रिंग लिमिटेडच्या खात्यावर १३ कोटी ९२ लाख असे एकून ९४ कोटी ४२ लाख सायबर चोरट्यांनी आतापर्यंत लुबाडले आहेत. या प्रकरणी पुण्याच्या चतृश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मुंबई सायबर पोलिसांची मदत का ?

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईत सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञान आहे. त्याच बरोबर मुंबई पोलिस अधिकारी हे सायबर गुन्हे व्यवस्थितरित्या हाताळत आहेत. त्या तुलनेत पुणे पोलिस तितकेसे प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिस संयुक्तरित्या करत आहेत.  या पूर्वी ही वाशीच्या एमजीएम रुग्णालयाची माहिती चोरून सायबर चोरट्यांनी खंडणी मागितली होती. याचा तपास देखील मुंबई सायबर पोलिस संयुक्तरित्या करत आहेत.

हा गुन्हा पुण्यात जरी घडला असला. तरी त्याचे पडसात देशभर उमटत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक राज्यातील सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू आहे. तूर्तास टेक्निकल मदतीसाठी मुंबईच्या सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे.
- बलसिंग राजपूत, महाराष्ट्र राज्य सायबर पोलिस अधिक्षक



हेही वाचा-

उत्तन समुद्र किनाऱ्यावरील हाॅटेलमध्ये रेव्ह पार्टी; पोलिसांचा छापा

मनसेच्या नगरसेवकाला का झाली अटक? वाचा...



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा