ज्वेलर्सची हत्या करणाऱ्या फरार अारोपीला अटक


ज्वेलर्सची हत्या करणाऱ्या फरार अारोपीला अटक
SHARES

घाटकोपरमधील ज्वेलर्स मालकाची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखा ५ च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे. नौशाद खान असं या आरोपीचं नाव असून २०१० पासून याच हत्येच्या गुन्हयात तो फरार होता. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.


सौदी अरेबियात पलायन

घाटकोपरमध्ये भरत रोहनलाल सिंग यांचे ज्वेलर्सचे दुकान होते. २०१० मध्ये नौशादने त्याच्या इतर दोन साथीदारांच्या साथीने रोहनलालला लुटण्याचा कट रचला होता. त्यानुसार रात्रीच्या वेळी दुकान बंद करून निघालेल्या रोहनलालवर नौशादने गोळी घालून त्याची हत्या केली अाणि तेथून पळ काढला. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०१७ रोजी मोहम्मद युसूफ रफिकउद्दीन मणियार याला जीवे मारण्याचा प्रयत्न नौशादनं केला होता. या दोन्ही घटनेत पोलिस मागे असल्याची माहिती मिळाल्यानंतर नौशाद त्याच्या मूळ गावी म्हणजेच उत्तरप्रदेशच्या आझमगढ येथे पळून गेला होता. तेथून तो सौदी अरेबियात वाहन चालकाची नोकरीसाठी गेला.


फिरून पुन्हा अाला मुंबईत

सौदीहून आल्यानंतर तो गुजरातमध्ये वाहन चालकाची नोकरी करत होता. २०१५ साली पुन्हा नौशाद आझमगड येथे आला. याचदरम्यान प्राॅपर्टीच्या वादातून त्याने सख्ख्या मेहुण्याची हत्या केली अाणि मुंबई गाठली. गोवंडीत तो वाहन चालकाची नोकरी करत होता. त्यावेळी त्याने वीजचोरी प्रकरणी झालेल्या वादातून मणियार यांच्यावर तलवारीनं प्राणघातक हल्ला केला. नौशाद हा अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांतील आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा ५ च्या पोलिसांनी त्याला अटक केली.


हेही वाचा -

मधुचंद्राच्या रात्री घात झाला, अंथरूणात 'ती' ऐवजी 'तो' निघाला!

ठाण्यात तरूणीची दिवसाढवळ्या हत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा