वकिल महिलेचा विनयभंग, एकाला अटक

मागील अनेक दिवसांपासून राहुल या महिलेचा पाठलाग करायचा. एवढ्यावरच न थांबता तो महिलेकडे पाहून अश्लील शेरेबाजी करायचा.

SHARE

परळ परिसरात राहणाऱ्या वकील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी एका रोडरोमियोला गुन्हा नोंदवून अटक केली आहे. कालिदास उर्फ राहुल असं या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.


जीवे मारण्याची धमकी

परळ परिसरात वकील महिला तिच्या आईसोबत राहते. याच परिसरात राहुल  देखील राहतो. मागील अनेक दिवसांपासून राहुल या महिलेचा पाठलाग करायचा. एवढ्यावरच न थांबता तो महिलेकडे पाहून अश्लील शेरेबाजी करायचा. महिलेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने राहुलने काही दिवसांपूर्वी महिलेची वाट अडवत तिच्याशी गैरवर्तन करू लागला. त्यावेळी  महिला मदतीसाठी आरडाओरडा करू लागल्यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून काढता पाय घेतला. या प्रकरणी महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी राहुलला अटक केली.हेही वाचा  - 

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: आरोपींना ३ दिवस पोलिस कोठडी

घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी, ८ जणांना अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या