म्हाडाच्या लाचखोर अधिकाऱ्यास अटक; घराचं अामिष दाखवून फसवणूक

म्हाडाने २००९ साली घरांची सोडत काढली होती. या सोडतीत विनासोडत घर मिळवून देतो असं सांगून तक्रारदार योगेश अहिर यांच्यासह अनेकांकडून २ कोटी २२ लाख रुपये युवराज सावंत पाटील, विद्याधर उर्फ बबन पाल, सुनीता तुपसौंदर्य, रमेश चव्हाण यांनी घेतले होते.

म्हाडाच्या लाचखोर अधिकाऱ्यास अटक; घराचं अामिष दाखवून फसवणूक
SHARES

 म्हाडाच्या घराचं आमिष दाखवून सर्वसामान्यांना लुटणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. युवराज पाटील सावंत असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.


सव्वादोन कोटी उकळले

म्हाडाने २००९ साली घरांची सोडत काढली होती. या सोडतीत विनासोडत घर मिळवून देतो असं सांगून तक्रारदार योगेश अहिर यांच्यासह अनेकांकडून २ कोटी २२ लाख रुपये युवराज सावंत पाटील, विद्याधर उर्फ बबन पाल, सुनीता तुपसौंदर्य, रमेश चव्हाण यांनी घेतले होते. मात्र, घर न मिळाल्याने २७ नोव्हेंबर २०१४ रोजी तक्रारदार योगेश अहिर यांच्यासह अनेकांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खार पोलिसांनी विद्याधर उर्फ बबन पाल, सुनीता तुपसौंदर्य, रमेश चव्हाण, जितेंद्र गाडिया यांना अटक केली. नंतर या चौघांची जामिनावर मुक्तता झाली होती. 


४ वर्ष सावंत फरार

पोलीस तपासात मात्र चार वर्ष म्हाडाचा अधिकारी असलेला युवराज सावंत पाटील फरार होता. या अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंध विभागाद्वारेही चौकशी सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तक्रारदार योगेश अहिर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी फरार आरोपी असलेल्या युवराज सावंत पाटीलला टिळक नगर येथील घरातून मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली असल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे संजय मोरे यांनी दिली. हेही वाचा - 

टी.पी.राजाची हत्या प्राॅपट्री वादातून?

उदानी हत्याकांडातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा