टी.पी.राजाची हत्या प्राॅपर्टीच्या वादातून?

टी.पी.राजा आणि इतर आरोपी हे फार जुने मित्र होते. या तिघांनी यापूर्वी धारावीतील एका विकासकाला तेथील रहिवाशांना हटवून प्लाॅट मोकळा करून दिला होता. अाता मिरारोड येथील जागेचा व्यवहार सुरू होता. मात्र या व्यवहारातून राजा आणि अमझत व कुरेशीत वाद सुरू होते.

SHARE

कुख्यात गुंड डी.के. रावचा हस्तक टी.पी. रावची काही दिवसांपूर्वी सायन येथे घरात घुसून दोघा जणांनी निर्घून हत्या केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मारेकरी अमझत मकबूल खान याला अटक केली. मात्र, यातील दुसरा आरोपी इम्रान कुरेशी याचा पोलिस शोध घेत आहेत. मिरारोड येथील जागेच्या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


जागेच्या व्यवहारावरून वाद

 टी.पी.राजा आणि इतर आरोपी हे फार जुने मित्र होते. या तिघांनी यापूर्वी धारावीतील एका विकासकाला तेथील रहिवाशांना हटवून प्लाॅट मोकळा करून दिला होता. अाता मिरारोड येथील जागेचा व्यवहार सुरू होता. मात्र या व्यवहारातून राजा आणि अमझत व कुरेशीत वाद सुरू होते. या वादातूनच या दोघांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


कृष्णा केबलवाल्याची हत्या

या आधी टी.पी.राजा, कुरेशी आणि नरेंद्र सिंग यांनी २००६ साली कृष्णा केबलवाल्याची शिवडी कोर्टाबाहेर हत्या केली होती. या हत्येत दोघांना मकोका अंतर्गत कारवाई केली होती. इम्रान हा घडफोडीतला सराईत आरोपी आहे. या हत्येच्या गुन्ह्यात दोघेही सात वर्ष तुरूंगात होते. २०१५ मध्ये  दोघेही जामीनावर बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी विकासकाशी हात मिळवणी करून प्लाॅट रिकामे करून देण्याचे काम करण्यास सुरूवात केली. राजावर १७, इम्रान कुरेशीवर १२ तर अमझतवर ३ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील इम्रानचा शोध पोलिस घेत आहेत.हेही वाचा - 

गुंड टी. पी. राजाच्या हत्येप्रकरणी आरोपीला राजस्थानातून अटक

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना १० वर्षाची शिक्षा
संबंधित विषय
ताज्या बातम्या