दिवसा चालवायचा टॅक्सी, रात्री करायचा घरफोड्या

एका रात्री यादव कोळीवाडा परिसरात संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करत त्याची झडती घेतली. घरफोडी करण्यासाठी कटावणी घेऊन फिरणाऱ्या यादवला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

SHARE

सकाळी टॅक्सी चालवून घरखर्च भागत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या एका टॅक्सी चालकाला दादर पोलिसांनी अटक केली आहे. शैलेशकुमार श्रीनाथ यादव उर्फ लल्लन (४३) असं या आरोपीचं नाव आहे.  यादवच्या चौकशीतून त्याने ७ घरफोड्या केल्या असल्याचं समोर आलं आहे. न्यायालयाने त्याला ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


कोळीवाडात चोऱ्या

वरळी कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या यादवच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी तो टॅक्सी चालवायचा. मात्र. या मिळकतीत घरखर्च भागत नसल्यामुळे त्याने रात्रीच्या वेळीस घरफोड्या करण्याचे ठरवले. कोळीवाडा परिसरातच रात्रीच्या वेळी बंद खोल्यांचे कुलूप तोडून तो घरफोड्या करू लागला. कोळीवाडा परिसरात वाढत्या घरफो़डींच्या गुन्ह्यांमुळे पोलिसांनी या परिसरात लक्ष केंद्रीत केलं. सर्व घरांत एकाच पद्धतीने चोऱ्या होत होत्या. 


मुद्देमाल हस्तगत 

एका रात्री यादव कोळीवाडा परिसरात संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करत त्याची झडती घेतली. घरफोडी करण्यासाठी कटावणी घेऊन फिरणाऱ्या यादवला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. यादवने आतापर्यंत ७ घरफोड्या केल्याची कबुली दिली अाहे. ७ पैकी ४ घरफोड्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. हेही वाचा - 

३० डिसेंबरच्या सायंकाळपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बालकांच लैगिक शोषण करणाऱ्याला आता मृत्यूदंड, 'पाॅक्सो' कायदा झाला आणखी कठोर
संबंधित विषय
ताज्या बातम्या