बालकांच लैंगिक शोषण करणाऱ्याला आता मृत्यूदंड, 'पाॅक्सो' कायदा झाला आणखी कठोर

आसिफा प्रकरणानंतर मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी देशभरातून उचलून धरण्यात आली. या मागणीनुसार महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी 'पाॅक्सो' कायदा कडक करण्याचं आश्वासन दिलं होतं.

बालकांच लैंगिक शोषण करणाऱ्याला आता मृत्यूदंड, 'पाॅक्सो' कायदा झाला आणखी कठोर
SHARES

लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पाॅक्सो) आता आणखी कठोर झाला आहे. त्यानुसार बालकांचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. 'पाॅक्सो' कायद्यातील बदलांना शुक्रवारी केंद्रीय मंत्रीमंळानं मान्यता दिली आहे. त्यामुळे आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

म्हणून कायद्यात बदल

बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी 'पाॅक्सो' कायदा आहे. मात्र या कायद्यात बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षेची तरतूदच नाही. त्यामुळं हा कायदा आणखी कडक करत बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी तसंच नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी कायद्यात बदल करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत होती.

आसिफा प्रकरणानंतर मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी देशभरातून उचलून धरण्यात आली. या मागणीनुसार महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी 'पाॅक्सो' कायदा कडक करण्याचं आश्वासन दिलं होतं.

मंत्रीमंडळाची मान्यता

त्यानुसार १२ वर्षाखालील बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा करण्यासारखा महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. या बदलाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे.

हेही वाचा-

शिवाजी पार्क इथं भररस्त्यात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न

दाऊदचा पुतण्या सोहेल कासकरचं महिन्याभरात प्रत्यार्पण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा