शिवाजी पार्क इथं भररस्त्यात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न

कुटुंबासोबत भांडण करून शिवाजी पार्क इथं आलेल्या तरुणीवर भरस्त्यात अत्याचाराचा प्रयत्न झाला. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी उमेश उर्फ रमेश रामलखन कनोजीया नावाच्या इस्त्रीवाल्याला अटक केली आहे.

शिवाजी पार्क इथं भररस्त्यात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न
SHARES

देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरी महिलासाठी किती असुरक्षित बनलीय याचा प्रत्यय घाटकोपर परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीला नुकताच आला. कुटुंबासोबत भांडण करून शिवाजी पार्क इथं आलेल्या तरुणीवर भरस्त्यात अत्याचाराचा प्रयत्न झाला. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी उमेश उर्फ रमेश रामलखन कनोजीया नावाच्या इस्त्रीवाल्याला अटक केली आहे.


भावासोबत भांडण

घाटकोपर इथं कुटुंबासोबत राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचं २६ डिसेंबर रोजी भावासोबत भांडण झालं. त्यामुळे मोबाइल घरातच सोडून तिने रागात घर सोडलं. रात्री ११ वाजता ही तरूणी टॅक्सीने शिवाजी पार्क इथं आली आणि समुद्र किनारी असलेल्या दगडांवर रडत बसली. रात्रीचे १२ वाजल्यानंतर चौपाटीवरील गर्दी कमी झाल्यावर मात्र ती घाबरली. परंतु सोबत मोबाइल नसल्याने घरच्यांना संपर्क कसा करावा या विचारात ती पडली.


इस्त्रीवाल्याकडे मदत

त्याचवेळी आरोपी इस्त्रीवाला एका कोपऱ्यात भांडी घासत होता. तरुणीने त्याच्याजवळ फोन मागितला आणि आपण सुखरुप असून घरी परतत असल्याचं भावाला फोनवरुन कळवलं. आरोपीला फोन परत देऊन घरी परतत असताना मात्र ही तरूणी रस्ता विसरली. तेव्हा तिच्या असहायतेचा फायदा घेत आरोपीने तिला गल्ली बोळातून फिरवून पुन्हा समुद्रकिनारी आणलं.


झटापटीनंतर सुटका

एवढ्यावरच न थांबता तरुणीला काही समजायच्या आतच त्याने तिच्यावर हात टाकत जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या आवाजापुढे तरुणीचा आवाजही कुणाला ऐकू जात नव्हता. अखेर १० ते १५ मिनिटांच्या झटापटीनंतर तरुणीने स्वत: ची कशीबशी सुटका करून घेत तिथून पळ काढला.


पोलिस आले मदतीला

तरीही आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. सुदैवाने काही अंतरावर तरुणीला गस्तीवर असलेली पोलिसांची गाडी दिसली. तेव्हा तिने पोलिसांची मदत घेत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर 354,354(अ), भा.द.वि. कलमानुसार गुन्ही नोंदवत त्याला अटक केली आहे.

पोलिस वेळीच देवदूत म्हणून आल्याने मी वाचले. अन्यथा मुंबईत रात्रीच्या वेळेत महिलांवर वाईट नजर ठेवून असणाऱ्या लांडग्याच्या हातून मी उद्धवस्त झाले असते, असं पीडितेने सांगितलं.



हेही वाचा-

दाऊदचा पुतण्या सोहेल कासकरचं महिन्याभरात प्रत्यार्पण

मुंबईत थर्टीफस्टआधीच १ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा