हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक

गोरेगावमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुंबई पोलिसांनी हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी दोन मुलींची सुटका करण्यात आली.

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक
SHARES

गोरेगावमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुंबई पोलिसांनी हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी दोन मुलींची सुटका करण्यात आली. तर मुलींना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींनाही अटक करण्यात आली आहे. अमृता धनोआ आणि रिचा सिंग अशी या अभिनेत्रींची नावे आहेत. 

या हाॅटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त डी स्वामी यांच्या नेतृत्वात पोलिसांनी हाॅटेलमध्ये धाड टाकली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी ग्राहक असल्याचं भासवत आरोपींशी संपर्क साधला. पोलिस अधिकारी ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले. त्यांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तरुणीशी संपर्क केला. यावेळी पैसे स्वीकारतानाच पोलिसांनी तरुणींना अटक केली. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र कांबळे यांनी आम्ही दोन तरुणींची सुटका केली असून, दोघींना अटक केली आहे, अशी माहिती दिली. 

 खबऱ्याद्वारे पोलिसांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. अटक करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक जण बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाची गर्लफ्रेंड असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

मुंबईला पुरवत होते भेसळयुक्त दुध

आईच्या हत्येप्रकरणी मुलाला अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा