अंधेरी गोळीबारप्रकरणी रवी पुजारीच्या आणखी तीन हस्तकांना नाशिकमधून अटक

अंधेरीच्या सहार गावात एका कंत्राटदारावर पूर्ववैमन्यसातून गोळीबार करणाऱ्या अन्य तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे.

अंधेरी गोळीबारप्रकरणी रवी पुजारीच्या आणखी तीन हस्तकांना नाशिकमधून अटक
SHARES

अंधेरीच्या सहार गावात एका कंत्राटदारावर पूर्ववैमन्यसातून गोळीबार करणाऱ्या अन्य तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. जावेद फारूख शेख (३६), महेश बिल बहादूर सिंग (२०), दर्शन बाळकृष्ण शेट्टी (१९) अशी या आरोपींची नाव असून त्यांना नाशिकमधून अटक केली आहे. या गुन्ह्यात या पूर्वीच अंधेरी पोलिसांनी विकास शर्मा या आरोपीला अटक केली आहे.


तिघे गेले होते पळून

अंधेरी पूर्व परिसरात राहणारा अब्दुल मुख्तार शेख उर्फ पप्पू हा बुधवारी सायंकाळी परिसरात वावरत असताना. पूर्ववैमन्यसातून विकाससह तीन आरोपींनी देशी कट्ट्याने मुख्तारवर तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्यात मुख्तार थोडक्यात बचावला. मात्र गोळीच्या आवाजाने झालेल्या धावपळीत एक महिला गंभीर जखमी झाली.या हल्यानंतर पोलिसांनी विकासला अटक केली. मात्र त्याचे इतर तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. हे तिघेही या हल्यानंतर नाशिकला पळून जाणार असल्याची माहिती विकासकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार जावेद फारूख शेख (३६), महेश बिल बहादूर सिंग (२०), दर्शन बाळकृष्ण शेट्टी (१९) या तीन आरोपींच्या शोधात गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक नाशिकला रवाना झाले. त्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक पोलिसांची मदत घेतली.


सीसीव्हीटीच्या मदतीनं आरोपींचा शोध

या आरोपीचे फोटो आणि सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. हे तिघे या पूर्वी ही गुन्हे करून नाशिकच्या भद्रकाली परिसरात आश्रयाला यायचे. दरम्यान मागच्या वेळी ज्या ठिकाणी हे आश्रयाला गेले होते. ती व्यक्ती त्यांना भेटत नव्हती. भद्रकाली परिसरात हे तिघे फिरत असल्याचे सीसीटिव्ही आणि खबऱ्यांकडून कळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली .या तिघांच्या चौकशीत त्यांना रवी पुजारीने ठेकेदारावर हा हल्ला करण्यास सांगितल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.या प्रकरणी अंधेरी पोलिसात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

भूतबाधा काढण्याच्या नावाखाली लिंबू विक्रेत्यानं लुटलं घरं

११ वर्षीय मुलावर तब्बल ३० शस्त्रक्रिया



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा