Advertisement

Corona virus : कोरोनाच्या भितीने पोलिस ही धास्तावले, दर दोन तासांनी केली जातेयं पोलिस ठाण्याची स्वच्छता

या बाधीत रुग्णांना सर्वात जास्त जवळून हाताळत आहेत. ते सहार आणि एअर पोर्ट पोलिस

Corona virus : कोरोनाच्या भितीने पोलिस ही धास्तावले, दर दोन तासांनी केली जातेयं पोलिस ठाण्याची स्वच्छता
SHARES
Advertisement

देशात कोरानोचे थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात परदेशातून येणार्या व्यक्तींमुळेच कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र या बाधीत रुग्णांना सर्वात जास्त जवळून हाताळत आहेत. ते सहार आणि एअर पोर्ट पोलिस, सध्या या दोन पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाची बाधा स्वतःला होऊ नयेत म्हणून खबरदारी घेताना दिसत आहे.


कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता ५२ वर पोहचली आहे. यापैकी मुंबईमध्ये  काही दिवसांपूर्वीच एका ६३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्ण्याच्या मृत्यूमध्ये अधिक तपस केला असता, या रुग्णामुळे अजून ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. घाटकोपर येथे राहणारी हि व्यक्ती दुबईवरून परत येताना विमानतळावरून टॅक्सी करून घरी पोहोचली होती. आणि या टॅक्सी मधून इतर लोकांना कोरोनाचा प्रसार झाल्याचे लक्षात येताच, मुंबई पोलिसांच्या सहार आणि एअर पोलिसांनी युद्ध पातळीवर टॅक्सी चालकाचा आणि त्या टॅक्सीतून दिवसभरात प्रवास केलेल्याचा शोध घेऊन त्यांची वैद्यकिय चाचणी केली. ही टॅक्सी प्रिपेड असल्यामुळे पोलिसांना यातून प्रवास करणाऱ्यांची माहिती वेळेत मिळाली. 

हेही वाचाः- दुकान उघडी ठेवल्यास होणार कारवाई - अनिल देशमुख

मात्र एअर पोर्टवर येणारे बहुतांश कोरोना ग्रस्त रुग्णांना पोलिसांनी हाताळले आहे. त्यामुळेच सहार आणि एअर पोलिस ठाण्यातील विमानतळावर गस्तीवर असलेल्या पोलिसांना ड्युटीनंतर दोन दिवसांची विशेष रजा वरिष्ठ पोलिसांनी घेण्यास सांगितली आहे. परदेशी नागरिकांचा किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचा या पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात वावर असल्याने विमानतळावरील स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून, दर दोन तासांनी या पोलिस ठाण्यांची साफ सफाई केली जात आहे. तसेच पोलिस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क वापरण्यास बंदी करण्यात आली आहे  तर पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल तपासणी केली जाते. तसेच पोलिस आयुक्तांनी सुरू केलेल्या स्वागत कक्षावर त्या व्यक्तीची माहिती घेतल्यानंतर त्याला सॅनेटाइझरने हात स्वच्छ केल्यानंतर प्रवेश दिला जात असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

हेही वाचाः- Coronavirus : राज्यातील कोरोनाबाधीतांची हाफ सेंच्युरी, ३ नवे रुग्ण आढळले

संबंधित विषय