पोलिसांचा खबरीच दहशतीखाली

शिवडी - पोलिसांचा खबरीच सध्या दहशतीखाली जगत असल्याचं शिवडीमध्ये समोर आले आहे. आकाश घुगे असं या खबरीचे नाव असून, गेल्या वर्षभरापासून त्याच्या घरच्यांना धमकीचे फोन येत आहेत. आकाश घुगे यानं एका वर्षापूर्वी ऑईल माफियांची खबर पोलिसांना दिल्यामुळे गुंडांकडून जबर मारहाण झाली होती. या मारहाणीत आकाश कसाबसा बचावला होता. मात्र एकवर्ष उलटूनही त्याला दहशतीखाली जगावं लागत आहे. पोलिसांना मदत करणाऱ्याचे कुटुंबच असं दहशतीखाली जगत असेल तर बाकीच्यांचा विचार न केलेलाच बरा.

Loading Comments