पैशांसाठी पुतण्याचं अपहरण


पैशांसाठी पुतण्याचं अपहरण
SHARES

पैशाच्या हव्यासापोटी आपल्याच पुतण्याचं अपहरण करून दिराकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चुलतीसह चार जणांना गुन्हे शाखा ४ च्या पोलिसांनी अटक केली आहे. शबीना अशरफ खान (२७),  सुलतान रियाजउल्ला खान (२६), जहांगीर हैदर अली शेख (२८), विल्यम उर्फ सोहेल अहमद सिद्धीकी (३३), गुफरान मोहम्मद आरिफ शेख (२६) अशी या आरोपींची नावे आहेत.
चाकूचा धाक दाखवून या मुलाला रिक्षातून अहरण केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांनी दिली.


भावावरचा राग काढला

कुर्ला पश्चिम परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाच्या वडिलांचा कपड्याचा व्यवसाय आहे. त्याचे चुलते हे कुर्लाच्या म्हाडा कॅालनी परिसरात राहतात. व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे ते कर्जबाजारी झाले होते. दररोज देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे अशरफ खान हे मानसिक तणावाखाली गेले होते. त्यातच भाऊ मदत करत नसल्यामुळे अशरफ यांचा पारा चढला होता. याच मानसिकतेतून अशरफची पत्नी शबीना हिने इतर आरोपींना हाताशी धरून दिराच्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला. पुतण्याचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागण्याचे ठरवले. 


चाकूच्या धाकाने अपहरण

 ३ आॅगस्ट रोजी शबानाने पुतण्याला घराखाली भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी तो घराखाली आल्यानंतर दबा धरून बसलेल्या इतर आरोपींनी त्याला चाकूचा धाक दाखवून त्याचे रिक्षातून अपहरण केले. यातील सिद्धीकीने त्या मुलाला आपल्या शिवाजीनगर येथील घरात डांबून ठेवले.  त्यानंतर सुलतान शेख अलीने त्या मुलाला पुन्हा शिवाजीनगर येथील म्हाडाच्या व्यावसायिक गाळ्यात आणून ठेवले.


शबानाने दिली कबुली

मुलाच्या अपहरणाप्रकरणी त्याच्या वडिलांनी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी घरातल्यांकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. कालांतराने हा गुन्हा गुन्हे शाखा ४ कडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान शबाना ही संशयीत व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला. शबानाकडे केलेल्या चौकशीत तिने गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.  



हेही वाचा- 

दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलाचे अपहरण

बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर अात्महत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा