जकात चूकवून आलेले पाच टेम्पो जप्त

 Dahisar
जकात चूकवून आलेले पाच टेम्पो जप्त

जकात न भरताच दहिसर चेकनाक्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱे पाच टेम्पो जकात अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पालिकेच्या दक्षता पथकाचे अधिकारी प्रशांत संख्ये करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दहिसर (पू.) इथल्या वैशालीनगरच्या बसस्टॉप जवळील शिवसंग्राम कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी पाच टेम्पो उभे असल्याचे पाहिले. त्यांनी त्या टेंम्पोचालकांना कुठून आल्याचे विचारले असता त्या टेम्पोचालकांनी पळ काढला. तेव्हा शिवसंग्रामचा एक कर्मचारी मेहबूब शेखने याची सूचना पोलिसांना दिल्यानंतर दहिसर पोलीस तात्काळ तिथे पोहचले. त्यानंतर दहिसर पोलिसांनी यासंदर्भाची माहिती दहिसर चेकनाकाच्या जकात विभागाला दिली. तेव्हा पालिकेच्या दक्षता विभागाचे अधिकारी प्रशांत संख्ये देखील तिथे पोहचल्यानंतर जकात न भरताच चेकनाका पार केल्याचे समोर आले. त्यांनी पाचही टेम्पो जप्त केले. संख्ये यांनी दिलेल्या माहितीनुसर टेम्पोत कपडे असून पुढील तपास सुरू आहे.

Loading Comments