दादरमध्ये पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न, चार तास सुरू होता थरार


दादरमध्ये पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न, चार तास सुरू होता थरार
SHARES
मुंबई पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने शनिवारी दुपारी शिंदेवाडी परिसरातील इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न केला. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर  वरिष्ठ पोलिस अधिकारी संगीता पाटील यांनी त्या पोलिसाची समजूत काढून त्याला आत्महत्येपासून रोखले.


‍शिंदेवाडीच्या शिवनेरी इमारतीच्या गच्छीवर एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची नियंञण कक्षाला मिळाली आणि भोईवाडा पोलिस कामाला लागले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने जात त्या व्यक्तीची विचारपूस केली. त्यावेळी तो देखील पोलिस दलातच कार्यरत असल्याचे त्याने सांगितले. सुशांत असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे कळते. त्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले. हे अद्याप समजू शकलेले नाही. माञ चार तास हा संपूर्ण थरार सुरू होता. सुशांतची अनेकांनी समजूत काढण्याचा  प्रयत्न केला. माञ तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी संगीता पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले. संगीता पाटील यांनी सुशांतला विश्वासात घेतले आणि त्याला आत्महत्येपासून रोखले.  पाटील यांनी सुशांतची समजूत काढत त्याला इमारती खाली आणले. त्यानंतर तातडीने सुशांतला समुपदेशासाठी रुग्णालयात नेले. याबाबत बोलताना संगीता पाटील यांनी आमचे हे कामच असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा