अंधेरीत डान्स बारवर छापा, तळघरात लपलेल्या १७ मुली ताब्यात

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं ही कारवाई केली.

अंधेरीत डान्स बारवर छापा, तळघरात लपलेल्या १७ मुली ताब्यात
SHARES

अंधेरीतल्या दीपा डान्स पोलिसांनी छापा टाकून १७ मुलींची सुटका केली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं ही कारवाई केली. याप्रकरणी बारच्या मॅनेजर आणि कॅशियरसह तीन कर्मचाऱ्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार गर्ल्सना बारच्या तळघरात ठेवण्यात आलं होतं. तिथून १७ मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे. कोरोना काळातही या डान्सबारमध्ये खुलेआम नियमांचं उल्लंघन होत असल्याची तक्रार एका एनजीओच्या वतीनं करण्यात आली होती.

पोलिसांच्या नियमानुसार बार डान्सर्स बारमध्ये खुलेआम डान्स करतात आणि दररोज शेकडो लोक या बार डान्सर्सवर लाखो रुपये खर्च करायला येतात. हा बार नियमाविरुद्ध रात्रभर सुरू असायचा. मात्र, स्थानिक अंधेरी पोलिसांना याची माहितीही मिळाली नव्हती.

संपूर्ण पोलीस दल आणि एनजीओ बारमध्ये पोहोचले. बारमध्ये तपास करत असताना त्यांची नजर भिंतीवर लावलेल्या आरशावर पडली. हा आरसा सामान्य आरशापेक्षा खूप मोठा असल्यानं एनजीओच्या लोकांना संशयास्पद वाटले.

एनजीओच्या टीमनं हा आरसा हटवला असता आरशाच्या मागे असलेली गुप्त खोली पोलिसांना दिसली. या खोलीत जाऊन पाहिले असता १७ बार बाला इथं लपून बसल्या होत्या. या सर्व बार बालांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.हेही वाचा

आर्यन खानची हायकोर्टात याचिका, केली 'ही' मागणी

सावधान! BOIच्या 'या भागातील ATM मधून २३ जणांचे पैसे चोरी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा