डॉक्टरचे अक्षर न समजल्याने गुन्हा दाखल करण्यास नकार

Kherwadi
डॉक्टरचे अक्षर न समजल्याने गुन्हा दाखल करण्यास नकार
डॉक्टरचे अक्षर न समजल्याने गुन्हा दाखल करण्यास नकार
डॉक्टरचे अक्षर न समजल्याने गुन्हा दाखल करण्यास नकार
डॉक्टरचे अक्षर न समजल्याने गुन्हा दाखल करण्यास नकार
See all
मुंबई  -  

कामात ढिसाळपणा करणे, काम नाकारणे या सगळ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा कोणी हात धरणार नाही. असाच काहीसा प्रकार मुंबईच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात समोर आला आहे. मारहाणीची तक्रार करण्यास आलेल्या एका महिलेला चक्क ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी डॉक्टरचे अक्षर समजत नसल्याचे कारण सांगत परत पाठवून दिले. या प्रकरणी पीडित महिला अजूनही पोलीस ठाण्याच्या खेटे मारत आहे. पण तिचे कुणीच ऐकून घेण्यास तयार नाही.

14 मे रोजी रात्री खेरवाडीला राहणाऱ्या कोमल धस (22) यांच्या घरात साखरपुड्याचा कार्यक्रम होता. जेवण वाढत असताना कोमल यांचा नवरा दिनेश याची त्यांच्याच समाजातील काही जणांसोबत बाचाबाची झाली. त्याचे पुढे मारामारीत रुपांतर झाले. यावेळी दिनेश एकटेच असल्याने त्यांच्या पत्नी कोमल त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडल्या पण मारहाण करणाऱ्यांनी कोमल यांनाही सोडले नाही. आरोपींनी त्यांचा हात इतका जोरात पिरगळला की कोमल यांच्या मस्तकात कळा गेल्या. त्यांना तात्काळ व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी कोमल यांच्या हाताचे हाड सरकल्याचे सांगत त्यांच्या हाताला प्लास्टर केले आणि सविस्तर रिपोर्ट दिला.

एवढे होऊन गप्प बसण्यात अर्थ नव्हता. कोमल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी निर्मल नगर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला.

"रुग्णालयातून मेडिकल रिपोर्ट घेऊन आम्ही थेट पोलीस ठाण्यात गेलो. माझ्या हाताला प्लास्टर देखील होते. पण तिथे बसलेल्या अधिकाऱ्याने डॉक्टरचे अक्षर समजत नसल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. मी स्वतः रुग्णालयात जाऊन डॉक्टरशी बोलेन, अशी प्रतिक्रिया त्या अधिकाऱ्याने दिली", असे कोमल यांनी सांगितले.

या प्रकरणी आम्ही डीसीपी तसेच अप्पर पोलीस आयुक्तांना देखील पत्र लिहले आहे. पण अद्याप काहीच करवाई न झाल्याचे दिनेश धस यांनी सांगितले. एवढेच नाही तर हा प्रकार झाल्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेल्याचे समजताच आरोपींनी आम्हाला घरी येऊन धमकावल्याचे दिनेश पुढे म्हणाले.

दरम्यान या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता आम्ही चौकशी करत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.