वडाळातून १० लाखांची बनावट दारू जप्त

वडाळा ब्रिजवरून एक जण कारमधून बनावट दारू विक्रीसाठी आणणार असल्याची माहीती पोर्ट झोन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रसून शिबिन दिनेश याला ताब्यात घेतले. त्याचा कारच्या डिकीत २२ नामांकीत कंपन्यांची बनावट दारू आढळून आली.

वडाळातून १० लाखांची बनावट दारू जप्त
SHARES

वडाळ्यातील बनावट दारू तयार करण्याच्या कारखान्यावर पोर्ट झोनच्या पोलिसांनी नुकतीच कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  शिबिन दिनेश (२५), निधिश के.के (२२) यांना अटक केली.  या दोघांजवळून १० लाख रुपयांची बनावट दारू जप्त केली आाहे. दोघेही नामांकीत कंपनीच्या दारू बनवून बाजारात विक्री करत होते. 


नामांकीत कंपन्यांची दारू 

वडाळा ब्रिजवरून एक जण कारमधून बनावट दारू विक्रीसाठी आणणार असल्याची माहीती पोर्ट झोन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रसून शिबिन दिनेश याला ताब्यात घेतले. त्याचा कारच्या डिकीत २२ नामांकीत कंपन्यांची बनावट दारू आढळून आली. ही दारू ज्ञानेश्वर नगर डी.जी. महाजन रोड. आरए किडवाई येथे एका साथीदाराच्या मदतीने बनवत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री शिबिनने सांगितल्यानुसार आर.ए. किडवाई परिसरात छापा टाकला. हे दोघेही एका घरात रासायनिक पदार्थाच्या मदतीने नामांकीत दारूच्या बाटल्यांमधील दारू बाजूला काढून त्यात रासायनिक प्रक्रिया केलेली बनावट दारू भरायचे.


१४ पट फायदा

हे दोन्ही आरोपी मूळचे केरळच्या ईरीक्कमा पोनाई राज्यातील आाहेत. मागील अनेक महिन्यांपासून ते हा गोरख धंदा करत होते. एक हजार रुपयांच्या गुंतवणूकीत या दोघांना १४ हजार रुपये मिळत असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त (पोर्ट झोन) डाॅ. रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष वाळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गंगाधर सोनावणे, पोलिस उपनिरीक्षक मसलकर आणि महिला पोलिस उपनिरीक्षक माने यांच्या पथकाने केली आहे. 



हेही वाचा -

निर्मात्याकडे २५ कोटींची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा