पोलीस चौकी बंद अवस्थेत, परिसरात गुंडाराज

 Shivaji Nagar
पोलीस चौकी बंद अवस्थेत, परिसरात गुंडाराज

गोवंडी - गेल्या अनेक महिन्यांपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारी पोलीस चौकी बंद स्थितीत आहे. त्यामुळे या परिसरात गुंडांचा हैदोस वाढला आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 6 पोलीस चौक्या येतात. ज्यामधील एक शिवाजीनगर इथल्या सिग्नलजवळ आहे. तर रफिकनगरमध्ये दुसरी चौकी आहे, तिसरी चौकी ही राम मंदिरजवळ, चौथी चौकी गीता विकास शाळेकडे आहे. पाचवी चौकी ही संजयनगरमध्ये असून सहावी चौकी ही संजयनगर परिसरात आहे. मात्र या चौक्यांची दुरवस्था झाली आहे. तिथे जुन्या मार्बलचा व्यवसाय सुरू आहे. तर पद्मानगरमधील चौकी खूपच लांब असून तीही शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. मात्र मागील अनेक महिन्यांपासून या चौकीला टाळे लागलेले आहे. त्यामुळे या परिसरात गुंडाराज सुरू आहे.

या परिसरातील रहिवासी सय्यद फैय्याजने सांगितलं की, अनेकदा हे गुंड मारहाण करतात. मात्र पोलीस चौकी लांब असल्याने पोलीस इथे येईपर्यंत गुंड फरार होतात. अनेकदा विनवणी करून देखील ही पोलीस चौकी अजूनही बंद अवस्थेत असल्याचं फैय्याज यांनी सांगितलं. तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमदेव डोले यांना यासंदर्भात विचारले असता लवकरच ही चौकी दुरुस्त करून ती सुरू करू असं त्यांनी सांगितलं.

Loading Comments