हिमालय दुर्घटनेची पोलिस करणार स्वतंत्र चौकशी


SHARE

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला  जोडणारा हिमालय ब्रिज दुर्घटनेची पोलिस पालिकेच्या अहवालाची मदत घेणार, माञ या प्रकरणाचीी पोलिस स्वत: ही स्वतंञ चौकशी करणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे. या प्रकरणी पालिकेनेे शुक्रवारी सादर केलेल्या अहवालाच पाच जणांना  दोषी ठरवले आहे. त्यात आँडिटची जबाबदारी देण्यात आलेल्या कंपनीचे मालक, दोन निवृत्त पालिका अधिकारी, तर दोन कार्यरत असलेल्या अधिकार्यांची नावे आहेत. या पाच ही जणांना लवकरच पोलिस चौकशीसाठी बोलवणार आहे. 


पोलिसात गुन्हा दाखल

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळ असलेला हिमालृ ब्रिज हा गुरूवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. तर 31 जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी आझाद मैदान पोलिसांत कलम 304 (अ)(हलगर्जीमुळे मृत्यू), 337 व 338 अंतर्गत हा गुन्हा नोंदवला.  या दुर्घटनेचा अहवाल 24 तासात सादर करण्याचे आदेश मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर शुक्रवारी पालिकेने या दुर्घटनेचा अहवाल सादर केला. या अहवालात ज्या "डिडि देसाई असोशिएट इंजिनिअर  कन्सलटन्सी अँड अँनलाइस्ट प्रा. लिमिटेड" कंपनीला आँडिटचे काम दिले होते. त्या कंपनीने यी ब्रिजमध्ये किरकोळ दुरूस्ती असून ब्रिज पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी धोकादायक नसल्याचे अहवालात म्हटलं आहे. 


काय म्हटलंय पालिकेच्या अहवालात

या 2017-18 वर्षाच्या ब्रिजच्या आँडिटचे काम पालिकेचे एक्झिकेटिव्ह  इंजिनिअर  ए.आर. पाटील हे देखरेखी खाली झाले. तर 2013-14 साली या ब्रिजच्या दुरूस्तीचे काम असिस्टंट इंजिनिअर एस.एफ. ककुलते यांच्या देखरेखी खाली झाले. या कामाला निवृत्त  पालिकेचे इंजिनिअर एस.ओ. कोरी आणि त्यांचे असिस्टंट आर.बी तारे यांनी मान्यता दिली असल्याचे अहवालात म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी कंञाटदार आर.पी.एस. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ही तितकीच दोषी असल्याचे अहवालात म्हटलं असून पालिकेने या कंपनीला ही शो काँज नोटिस पाटवत तिचे नाव काळ्या यादीत नोंदवले आहे.पोलिस करणार स्वतंञ्य चौकशी

ब्रिज दुर्घटनेनंतर आझाद मैदान पोलिस ठाण्यात अपघात कारणीभूत असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जरी पोलिसांंनी पालिकेच्या अहवालाची मदत घेतली. तरी पोलिस ही या प्रकरणाची स्वतंञ्य चौकशी करून अहवाल बनवणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे. माञ प्राथमिक टप्प्यात तपास सुरू असून एवढ्या लवकर कोणाचाही नावाचा सहभाग गुन्ह्यांत करण्यात आला नसल्याचे अधिका-याने सांगितले. 


वाहतुक नियंत्रीत 

अपघातानंतर पालिकेच्यावतीने  24 तासानंतर हा ब्रिज पाडण्याच्य कामास सुरूवात करण्यात आली. दुर्घटनेनंतर ही पालिकेच्या अधिकार्यांनी घेतलेल्या मिटिंगमध्ये उर्वरित ब्रिजचा ढाचा कमकूवत नाही. याच पूलावर पून्हा बांधकाम करून तो सुरू करावा असे मत पालिकेच्या बांधकाम विभागाच्या तद्न्यांनी मत मांडले. माञ पालिकेने हा ब्रिज पून्हा नव्यानेच बांधण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारी सांयकाळी 6 नंतर म्हणजेच तब्बल 24 तासानंतर ब्रिज पाडण्याचे काम सुरू केले. तब्बल 8 तासानंतर हा ब्रिज तोडण्यात अग्निशमन दलाला आले. वेळीच हा निर्णय घेतला असता. तर शुक्रवारी दुपारपर्यंत हा ब्रिज पाडून वाहतूक सुरळीत करता आली असता. माञ पालिका अधिकार्यांमध्ये  एकमत नसल्यामुळे 24 तासानंतर या ब्रिजसा पाडण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे एका अग्निशमन दलाच्या अधिकार्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.


घटनास्थळी आता सिग्नल व्यवस्था ?

ब्रिज दुर्घटनेनंतर नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना सीएसएमटी स्थानकाच्या  दिशेने सुखरूप जाता यावे. या दृष्टीने त्या ठिकाणी नवीन सिग्नल उभारण्यात येणार  आहे. त्यासाठी दोन्ही रस्त्यांमधील दुभाजक ही हटवण्यात आले असून त्या ठिकाणा झेब्रा क्रासिंग ही रेखाटण्यात येणार आहे. तसेच 12 तास पोलिस कर्मचारी या सिग्नलवर तैनात राहणार असल्याचा माहिती एका बड्या अधिकार्याने दिली आहे. माञ याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या