त्याच्या पेन ड्राइव्हमध्ये सापडल्या ब्ल्यू फिल्म्स

  Malad West
  त्याच्या पेन ड्राइव्हमध्ये सापडल्या ब्ल्यू फिल्म्स
  मुंबई  -  

  मालाड येथील दोन सख्ख्या बहिणींचे ब्रेन वॉश करून त्यांना सेक्स आणि ड्रग रॅकेटमध्ये जुंपल्याचा आरोप असलेल्या सुनील कुलकर्णीला अखेर अटक करण्यात आली आहे. कुलकर्णीला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याची कोठडी मागताना त्याच्या पेन ड्राइव्हमध्ये अश्लील चित्रफिती मिळाल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्याला 28 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

  मालाड येथील एका दांपत्याने त्यांच्या दोन मुलींनी या सुनील कुलकर्णीच्या नादाला लागून राहते घर सोडल्याचा आरोप केला होता. एवढच नव्हे तर हे कुलकर्णी महाशय 'शिफू संस्कृती'च्या नावाखाली तरुण मुलींना ड्रग्स आणि सेक्स रॅकेटमध्ये गुंतवत असल्याचाही गंभिर त्याच्यावर आरोप लावला होता. ज्यावेळी न्यायालयासमोर हा सगळा प्रकार आला, तेव्हा न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत तसेच या प्रकरणाची गंभिर दखल घेत पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणातील दोन्ही मुली सज्ञान असून त्यांनी मात्र आई-वडिलांनी केलेल्या सगळ्या आरोपांचे खंडन केले आहे. आम्ही आई-वडिलांच्या जाचाला कंटाळून घर सोडल्याचा जबाब त्यांनी पोलिसाना दिला होता.

  काय आहे 'शिफू संस्कृती'

  सुनील कुलकर्णीने शिफू संस्कृती या नावाने सुरू केलेल्या फेसबुक पेजवर अनेक दावे केले आहेत. आत्मा व परमात्मा चे मिलन अश्या अवस्थेत घेऊन जाउ शकतो जीथे बुद्धी आणि मन हे एकाच पध्दतीने काम करतील असे एक ना अनेक दावे या पेज वर करण्यात आले आहेत. या पेजवरील बराचसा मजकूर हा सेक्स या विषयावर आहे. सेक्सपेक्टेशन, कोलेजच्या मुला मुलीनमधील शारीरिक संबंध, डेटिंग प्रेम या सगळ्याबद्दल या पेज वर अगदी सविस्तर लिखाण करण्यात आले आहे.
  सुनील कुलकर्णीच या पेजेसचा सर्वेसर्वा आहे.तो स्वत:ला मानसोपचार तज्ञ असल्याचा दावा करताे मात्र त्याच्याकडे कोणतीही पदवी नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपासह फसवणुकीचे अनेक गुन्हे कुलकर्णीवर नोंद आहेत.

  न्यायालयाच्या आदेशानुसार सुनील कुलकर्णी विरोधात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती मुंबई पोलीसांचे प्रवक्ते डीसीपी अशोक दुधे यांनी दिली. दरम्यान कुलकर्णीच्या अटकेनंतर आणखी काही पीड़ित मुली त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.