डेटींगच्या नावाखाली 'सीए'ला ३ लाखांना गंडवलं

संकेतस्थळावरील महिलेनं तक्रारदाराकडून नोंदणीसाठी ८५० रुपये, संबधित तरुणीशी बोलण्यासाठी १८,७०० रुपये, प्रायव्हसी अॅग्रीमेन्ट ५० हजार, सुरक्षा ठेव ६० असं एका मागोमाग एक ३ लाख उकळले.

SHARE

डेटिंग सारख्या संकेतस्थळावर भेट देणाऱ्या चार्टड अकाऊन्टंटला (सीए) साडे तीन लाखांना गंडा घालण्यात आल्याची घटना पवई परिसरात घडली. Www.locanto.com या संकेत स्थळावरून ५४ वर्षीय तक्रारदार एका बंगाली महिलेच्या संपर्कात होता. या प्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.

बंगाली महिलेशी डेटिंग

पवई परिसरात राहणाऱ्या तक्रारदारानं पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं खरं, मात्र दुसऱ्या पत्नीशी ही त्याचं पटत नसल्यामुळं तिच्यासोबतची ही घटस्फोटाची प्रक्रीया सुरू आहे. एप्रिल महिन्यात या तक्रारदारानं Www.locanto.com या संकेत स्थळावर नमूद मोबाइलवर फोन केला. त्यावेळी समोरील महिलेकडं तक्रारदारानं एका बंगाली महिलेशी डेटिंग करायची असल्यची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार संकेतस्थळाचं काम पहात असलेल्या महिलेनं तक्रारदाराला ४ महिलांचे फोटो पाठवले. त्यातील एका महिलेशी डेटींग करण्याची इच्छा तक्रारदारानं व्यक्त केली. त्यानुसार संकेतस्थळावरील महिलेनं सर्वप्रथम तक्रारदाराकडून त्याची सर्व ओळखपत्र जमा करून घेतली.


पैशांची मागणी 

त्यानंतर, संकेतस्थळावरील महिलेनं तक्रारदाराकडून नोंदणीसाठी ८५० रुपये, संबधित तरुणीशी बोलण्यासाठी १८,७०० रुपये, प्रायव्हसी अॅग्रीमेन्ट ५० हजार, सुरक्षा ठेव ६० असे एका मागोमाग एक ३ लाख उकळले. मात्र, तरीही पैशांची मागणी कमी होत नव्हती. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदारानं पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

मिठी नदीला पर्यटन स्थळ करण्यासाठी महापालिका करणार २१ कोटी खर्च

महाराष्ट्रात तंबाखू आणि तंबाखुजन्य पदार्थांनतर ई-सिगरेटवर बंदीसंबंधित विषय
ताज्या बातम्या