कळ सोसवली नाही, तळीरामाने 'इथलं' दारूचं दुकानच फोडलं


कळ सोसवली नाही, तळीरामाने 'इथलं' दारूचं दुकानच फोडलं
SHARES

 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र लाँकडाऊन करण्यात आला होता. त्यात दारूची ही दुकाने बंद झाल्यामुळे तळीरामांचे चांगलेच वांदे झाले. म्हणूनच की काय कळ न सहन झालेल्या तळीरामांनी दारूच्या दुकानातस चोरी करून तब्बल 8 लाखांची दारू आणि लाखभर रुपये चोरल्याचा प्रकार पवईत समोर आला आहे. या प्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.


राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर मार्चपासून राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. यात दारूच्या दुकानांचाही समावेश होता. मात्र राज्य सरकार आणि उत्पादन शुल्क विभागाने काही अटी-शर्थी घालत दोन दिवसापूर्वी दारू विक्रीस परवानगी दिली. त्यानुसार सोमवारी पवईतील तुंगागाव येथे असणाऱ्या एका दुकानदाराने आपले दारूचे दुकान उघडले. दुकान उघडताच समोरील परिस्थिती पाहता त्याला धक्काच बसला. दुकानातील मद्याच्या बॉटल्स आणि गल्ल्यातील रोकड चोरी झाली होती. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर दुकानात असणाऱ्या लोखंडी कपाटात आम्ही सर्व दारूच्या बाटल्या ठेवल्या. सोमवारी दुकान उघडले तेव्हा माहिती पडले की येथील 8 लाख किंमतीच्या दारूच्या बाटल्या आणि गल्ल्यात ठेवलेले  1. लाखाची रोकड चोरीस गेली आहे.

“दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आहे. नंतर त्यांनी जाताना ते व्यवस्थित करून ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. दुकान बंद असल्यामुळे दुकानातील लाईट आणि सीसीटीव्ही दोन्ही बंद ठेवण्यात आले होते. 21 मार्च ते 4 मे दरम्यान ही घटना कधी घडली आहे. नक्की कधी घडली हे अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून, आसपासच्या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज मागवले आहे. फुटेजच्या आधारावर ते चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा