इक्बाल मिर्ची प्रकरणी प्रफुल पटेल यांना पुन्हा ईडीकडून समन्स

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या जमीन आणि आर्थिक व्यवहारप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावलं जाणार आहे.

इक्बाल मिर्ची प्रकरणी प्रफुल पटेल यांना पुन्हा ईडीकडून समन्स
SHARES

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या जमीन आणि आर्थिक व्यवहारप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावलं जाणार आहे. त्यांना ईडी कार्यालयात आता हजेरी लावावी लागणार आहे.

याआधी प्रफुल पटेल यांना समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र तेव्हा ते ईडी कार्यालयात गेले नव्हते. यामुळे त्यांना पुन्हा समन्स पाठवलं जाणार आहे. दाऊद इब्राहिम याचा साथीदार आणि ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआयशी कनेक्शन असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात ईडीने नुकतंच एक आरोपपत्रं दाखल केलं होतं. मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. 

पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने २००६-०७ मध्ये “सीजे हाऊस’ नावाची इमारत बांधली आणि तिचा तिसरा आणि चौथा मजला मिर्चीची पत्नी हजारा इक्‍बाल यांना हस्तांतरित करण्यात आला. ज्या जागेवर इमारत बनविली गेली ती मिर्चीची असल्याचे सांगितले जाते. “मनी लॉंन्डरिंग’, ड्रग्सची तस्करी आणि खंडणीखोरीच्या गुन्ह्यांमधून ही जमीन विकत घेण्यात आल्याचा तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये ईडीने इक्बाल मिर्चीच्या घरावर कारवाई केली होती. यावेळी ईडीने त्याची संपत्ती जप्त केली होती. ईडीने जप्त केलेल्या या संपत्तीत एक सिनेमागृह, हॉटेल, निर्माणाधीन हॉटेल, एक फार्महाऊस, दोन बंगले आणि पाचगणीतील ३.५ एकरच्या जमिनीचा समावेश आहे. यापूर्वी ईडीने इक्बाल मिर्चीची ७७६ कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यात २०३ कोटींच्या विदेशातील संपत्तीचाही समावेश होता.



हेही वाचा -

कोविड चाचणी होणार आता ४९९ रुपयांत

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा