दहिसरमध्ये गर्भवती महिलेला मारहाण

 Dahisar
दहिसरमध्ये गर्भवती महिलेला मारहाण

दहिसर पूर्वच्या अंबाडी परिसरात गर्भवती महिलेची छेड काढणे आणि मारहाण करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन खान असे त्याचे नाव आहे. त्याचे साथीदार मात्र फरार आहेत. पोलिसांच्या हाती हे फरार आरोपी अजूनही लागलेले नाहीत. त्यामुळे पीडित महिलेने आरोप केला आहे की, पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडून माझ्या काही नातेवाईकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित महिलेच्या भावावरही काही अज्ञातांकडून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. जेव्हा पीडितेच्या भावाने तक्रार मागे घेण्यास मनाई केल्यानंतर त्याला धमकी येऊ लागली, असे पीडित महिलेचा आणि तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे. "सफिजमा नावाचा व्यक्ती आमच्या चाळीत राहतो. गेल्या काही दिवसांपासून आमचे वाद सुरू होते. पण आपापसात वाटाघाटी करून आम्ही प्रकरण मार्गी लावले होते. तरीही सफिजमा यांचा मुलगा मोहसीन खान आणि त्याच्या भावानं मिळून माझ्या बहिणीला मारहाण केली," असा आरोप पीडितेचा भाऊ संजय विशवकर्मा याने केला. सफिजमा खान हा रजा ए हक नावाच्या कंपनीत सचिव आहे. त्याला राजकीय पाठबळ असल्याने पोलिसांनी मोहसीनचे भाऊ कलीम, जुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही, असाही आरोप संजयने केला आहे.

याप्रकरणी दहिसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरिक्षक सुभाष सावंत यांनी आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगितले.

Loading Comments