डोंबिवलीत उच्चभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम खात्री केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं छापा टाकला.

डोंबिवलीत उच्चभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
SHARES

डोंबिवलीतील उच्चभ्रू वस्तीत चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ठाण्याच्या अँटी ह्यमुन ट्रॅफिक सेलने केला आहे. डोंबिवली पूर्वेकडील लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये हे सेक्स रॅकेट सुरू होते. यावेळी चार तरुणींची सुटका करण्यात आली. तर लॉजच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला सांगली चौकात बालाजी दर्शन या इमारतीच्या समोर साईराज लॉजिंग अँड बोर्डिंग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलला मिळाली होती. सोमवारी रात्री येथे छापा टाकला असता यावेळी चार तरुणी वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या. 

पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या लॉजवर अचानक छापा टाकला. यावेळी लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींचे पुरवठादार दोन दलालांच्या तावडीतून 4 तरुणींची सुटका केली. या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली.

कित्येक दिवसांपासून या भागात वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम खात्री केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं छापा टाकला. यावेळी लॉजचा मॅनेजर, कॅशियर आणि दोन वेटरसह दोन दलालांनाही अटक करण्यात आली. सहा आरोपींवर कलम ३७६ (२), ३७० (२), ३४ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा