Advertisement

नवीन हँकॉक ब्रिज कधी होणार?


नवीन हँकॉक ब्रिज कधी होणार?
SHARES
Advertisement

सँडहस्ट रोड - येथील हँकॉक ब्रिज धोकादायक झाल्याने एक वर्षापूर्वी पाडण्यात आला होता. मात्र एक वर्ष उलटूनही या ठिकाणी नवीन ब्रिज बनवण्या संदर्भात कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. हा ब्रिज नसल्यामुळे इथल्या स्थनिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ब्रिज नसल्याने रहिवाशांना एका बाजूहून दुसऱ्या बाजूला जायला तब्बल तीन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. यामध्ये शाळकरी मुलांचे मोठे हाल होत आहेत.

याविरोधात सोमवारी सकाळी 9.30 वाजता माझगाव एकतानगर झोपडपट्टी येथील स्थानिक समाजसेवक दिनेश राठोड आंदोलन करणार होते. दिनेश राठोड यांनी यासंदर्भात पोलिसांना नोटीस दिली होती. मात्र पोलिसांनी आचार संहितेचे कारण देत दिनेश राठोड यांना राहत्या घरातून अटक करून भायखळा पोलीस ठाण्यात ठेवले. पण थोड्या वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर दिनेश राठोड यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. दरम्यान पोलिसांनी सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवलाय.

संबंधित विषय
Advertisement