सेशन्स कोर्टात आरोपीचा साक्षीदारावर हल्ला

  Fort
  सेशन्स कोर्टात आरोपीचा साक्षीदारावर हल्ला
  मुंबई  -  

  मुंबईच्या सेशन्स कोर्टात एका आरोपीने दुसऱ्या आरोपीवर जीवघेणा हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हल्ला करणारा आरोपी हा साधा सुधा आरोपी नसून, 2011 साली कुरार व्हिलेजमध्ये चार हत्या केल्याचा आरोप असलेला उदय पाठक आहे. साथीदार असलेला आरोपी केसमध्ये माफीचा साक्षीदार झाल्याने उदय पाठकने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  गुरुवारी या हत्येच्या खटल्याची तारीख असल्याने उदय पाठकसह इतर आरोपींना देखील सेशन्स कोर्टात अाणण्यात आले. या केसमध्ये कल्पेश पटेल हा माफीचा साक्षीदार झाल्याने त्याला वेगळ्या एस्कॉर्ट टीमने आर्थर रोड जेलमधून आणले. केस सुरू होण्यापूर्वी कोर्ट नंबर 17 च्या समोर हे दोन्ही आरोपी एकमेकांसमोर आले आणि अचानक उदय पाठक हा कल्पेश पटेलवर धावून गेला आणि त्याने लपवून आणलेल्या लोखंडी पट्टीने कल्पेशच्या चेहऱ्यावर तसेच मानेवर वार केले. यावेळी कल्पेशला त्याने जीवे मारण्याची देखील धमकी दिली. जे पोलीस पथक त्याला घेऊन आले होते, त्यांना देखील या उदय पाठकने धक्काबुक्की केली. सुदैवाने पोलिसांनी तात्काळ उदयच्या मुसक्या आवळल्याने कल्पेश थोडक्यात बचावला.

  या प्रकरणी आम्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न करण्याचा तसेच पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आणि त्यांच्याशी धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांनी दिली. जून 2011 साली मुंबईच्या कुरार व्हिलेज येथील अप्पापाडा डोंगरात झालेल्या चार हत्यांनी एकच खळबळ उडाली होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.