घरफोड्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद

 Pali Hill
घरफोड्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद
घरफोड्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद
घरफोड्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद
See all

मुंबई - घरफोड्यांच्या आंतरराज्य टोळीला गुन्हे अन्वेशन विभागाच्या युनिट 12 ने जेरबंद केले आहे. पश्चिम उपनगरात धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीतील चार घरफोड्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, हे चारही जण दिल्लीचे आहेत.

हे चौघेही दुपारच्या वेळेस बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी करीत असत. याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. तपास सुरू असाताना जण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.

दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर हे चौघे गेस्ट हाऊसमध्ये राहायचे. त्यानंतर दुपारच्या वेळेस सोसायटीत जाऊन रेकी करायचे. एखाद्या घराची बेल वारंवार वाजवूनही दरवाजा उघडला न गेल्यास तर हे घरफोडी करायचे. त्यानंतर घऱफोडीचा माल झवेरी बाजारातील ज्वेलर्सकडे विकायचे.

Loading Comments