'संस्कारी बाबूजीं'वर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल

अभिनेते आलोक नाथ यांच्यावर ओशिवरा पोलिसांनी अखेर बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. 8 नोव्हेंबरला फिल्ममेकर विन्ता दास यांनी याप्रकरणी लेखी तक्रार पोलिसांत नोंदवली होती.

'संस्कारी बाबूजीं'वर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल
SHARES

'हम आपके है कोन',' हम साथ साथ है' या गाजलेल्या चित्रपटात संस्कारी बाबूजी म्हणून उदयास आलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर ओशिवरा पोलिसांनी अखेर बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. 8 नोव्हेंबरला फिल्ममेकर विन्ता दास यांनी याप्रकरणी लेखी तक्रार पोलिसांत नोंदवली होती.

वीस एक वर्षांपूर्वी आलोकनाथ यांनी संधीचा फायदा घेऊन बलात्कार केल्याचा आरोप विन्ता नंदा यांनी केला होता. याप्रकरणी अद्याप आलोखनाथ यांना अटक करण्यात आली नसून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


विन्ता यांचा आरोप

20 वर्षांपूर्वी 'तारा' या मालिकेच्या शुटिंगनंतर आलोक नाथ एका पार्टीनंतर विन्ता नंदा यांना घरी सोडण्याचा आग्रह करत त्यांच्या घरी गेले आणि तिथे त्यांनी संधीचा फायदा घेऊन बलात्कार केला, असा आरोप विन्ता यांनी केला.

या धक्क्यातून सावरायला आपल्याला खूप वेळ लागला. पण आज मुलींनी अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे, असं सांगत विनता नंदा यांनी ही धक्कादायक घटना सोशल मीडियावर शेअर केली.


अखेर गुन्हा दाखल

हे प्रकरणी #मी टू या चळवळीदरम्यान पुढे आल्यानंतर विनता यांनी आलोकनाथ यांच्याविरोधात 8 ऑक्टोबरला एक लेखी तक्रारपत्र ओशिवरा पोलिसांना दिलं होतं. त्या तक्रारीची शाहनिशा केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आलोखनाथ यांच्यावर पोलिसांनी जबरी आणि अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी भादंवि 376(1) आणि 377 या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा - 

#Metoo: आलोक नाथ अाणखी अडचणीत; संध्या मृदूल यांचाही गैरवर्तनाचा अारोप

#Metoo : 'संस्कारी बाबूजीं'च्या अडचणीत वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा