टी-सीरिजचे संचालक भूषण कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आतापर्यंत टी-सीरिजकडून या आरोपांबाबत कोणतेही स्पष्टीकरण समोर आलं नाही.

टी-सीरिजचे संचालक भूषण कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
SHARES

T-Series चे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर मुंबईतील डीएन नगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांच्यावर एका ३० वर्षीय महिलेनं चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मात्र, आतापर्यंत टी-सीरिजकडून या आरोपांबाबत कोणतेही स्पष्टीकरण समोर आलं नाही.

काम देण्याचं आमिष दाखवून भूषण कुमार यांनी २०१७ ते ऑगस्ट २०२० (३ वर्षे) पर्यंत अत्याचार केल्याचा या महिलेचा आरोप आहे.

पीडित महिलेचा आरोप आहे की, भूषण कुमार यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. भूषण कुमार यांनी तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिनं केला आहे. भूषण केवळ टी-सीरिजचे मॅनेजिंग डायरेक्टरच नाही तर अनेक बड्या चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारीही ते सांभाळत आहे.

२००१ साली भूषण कुमार यांनी 'तुम बिन' या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. भूल भुलैया, आशिकी 2, सनम रे, ऑल इज वेल, सरबजीत, बादशाहो, तुम्हारी सुलु, भारत आणि सत्यमेव जयते अशा अनेक चित्रपटांची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे.हेही वाचा

अनिल देशमुखांची ४ कोटींची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा