मोलकरणीवर बलात्कारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला अटक

पीडित महिला शनिवारी नेहमीप्रमाणे घरकाम करण्यासाठी आली होती. मुलांच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलेही आईच्या मागे लागून तिच्यासोबत आली होती. त्यावेळी आगवणेने यांनी दोन्ही मुलांना एका खोलीत बंद करून मोलकरणीवर अत्याचार केले.

मोलकरणीवर बलात्कारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला अटक
SHARES
मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी प्रफुल आगवणे (४६) या पोलिस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. पीडितेवर बलात्कार करून तिला तिच्या मुलांसह आगवणे यांनी कोंडून ठेवले. 


मुलांना कोंडले

कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले आगवणे विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात राहतात. त्यांच्या घरी पीडित ३१ वर्षीय महिला घरकाम करण्यासाठी यायची. पीडित महिला शनिवारी नेहमीप्रमाणे घरकाम करण्यासाठी आली होती. मुलांच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे  मुलेही आईच्या मागे लागून तिच्यासोबत आली होती. त्यावेळी आगवणेने यांनी  दोन्ही मुलांना एका खोलीत बंद करून मोलकरणीवर अत्याचार केले. त्यानंतर आगवणेने तिला खोलीत बंद करून बाहेरून कुलुप लावले.


आगवणेंची दोन लग्न 

घडलेल्या घटनेची माहिती पीडितेने मोबाइलवरून तिच्या भावाला दिली. त्यावेळी त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलांची आणि तिची सुटका केली. आगवणे यांची दोन लग्न झाली असून  पहिल्या पत्नीचं निधन झालं आहे. तर दुसरी पत्नी  विभक्त राहते. या प्रकरणात पीडितेने शनिवारी तक्रार दिल्यानंतर आगवणे यांना अटक केली आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा  -

विमानतळ परिसरात देशीकट्यासह घुसण्याचा प्रयत्न, चालकाला अटक

हत्या करून आत्महत्येचा बनाव, एकाला अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा