10 हजारांसाठी अपहरण करणाऱ्याला अटक

 wadala
10 हजारांसाठी अपहरण करणाऱ्याला अटक
10 हजारांसाठी अपहरण करणाऱ्याला अटक
10 हजारांसाठी अपहरण करणाऱ्याला अटक
See all

अॅन्टॉप हिल - 10 वर्षीय मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी दिलीप राय नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मुलाचं अपहरण करुन दिलीपने त्याच्या वडिलांकडून 10 हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी वडिलांनी अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी लगेचच मुलाचा तपास सुरू केला. दिलीप मुलाला घेऊन वापीला पळून जाणार होता. पोलिसांना तो दहाणु स्टेशनवर असल्याचं कळताच सापळा रचून त्याला अटक केली आणि मुलाला आपल्या ताब्यात घेतलं. पोलिसांनी सुखरुप त्या मुलाला त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीपने एक क्राईम सीरियल बघून हे अपहरण केलं. दिलीपला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Loading Comments