सुशांतच्या खात्यातून रियाने ९० दिवसात केले ३ कोटी खर्च

बिहार पोलिसांनी प्रथम सुशांतच्या बँकेती व्यवहारांवर लक्ष केंद्रीत करत, बँकेतून सुशांतच्या खात्यावरून वळवण्यात आलेल्या पैशांची माहिती जमा केली. त्यातून हीबाब पुढे आल्याचे सांगितले जाते.

सुशांतच्या खात्यातून रियाने ९० दिवसात केले ३ कोटी खर्च
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत  याच्या आत्महत्येला कित्येक दिवस उलटूनही अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबईसह बिहार पोलिसही शर्तीचे प्रयत्न करत आहे. या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती सुशांतचे वडिल के.के. सिंह यांनी रिया विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर, त्यानुसार पोलिस तपासात रियाने ९० दिवसात सुशांतच्या खात्यातून ३ कोटी रुपये खर्च केल्याचे आता चौकशीतून पुढे आले आहे.

हेही वाचाः- सुशांत आत्महत्या प्रकरण! तपासासाठी आलेल्या अधिकाऱ्याला केलं १५ दिवसांसाठी क्वारनटाईन

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत, सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिस मुख्य आरोपीला सोडून नको त्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलवत असल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी केला होता.  सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची दिशाच बदलली. या आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले. ज्यावेळी त्यांनी या प्रकणाचा तपास सुरू केला. त्या दिवसापासून ते स्वतंत्र तपास करत आहेत. बिहार पोलिसांनी प्रथम सुशांतच्या बँकेती व्यवहारांवर लक्ष केंद्रीत करत, बँकेतून सुशांतच्या खात्यावरून वळवण्यात आलेल्या पैशांची माहिती जमा केली. आत्महत्येच्या दिवशी घरात उपस्थितांकडे चौकशी केली. त्यातून रियाने सुशांतच्या बँकेतील खात्यातून ९० दिवसात तब्बल ३ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचाः- सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणी ‘कूक’ने केला मोठा खुलासा

सुशांतच्या वडिलांनी देखील दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये आपल्या मुलाच्या बँक अकाउंटमधून पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला होता. यापूर्वी चौकशीत सुशांतच्या बँकेतील खात्यातून तब्बल १७ कोटी वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रीग झाल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान बिहार पोलिसांचे जे पथक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आले होते. त्यांच्या मार्गदर्शनासाठी पाठवलेल्या बिहारच्या एसपीना आता १५दिवसांसाठी क्वारनटाईन करण्यात आले आहे. त्यावरून बिहारचे पोलिस महासंचालक चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विटरहून एसपी विनय तिवारी यांना जबरदस्ती क्वारनटाईन करण्यात आल्याचे सांगितले आहे.  दरम्यान सुशांतच्या वडिलांना या प्रकरणी सीबीआय तपासणी करावीशी वाटत असल्यात ते त्यासाठी मागणी करु शकतात. आम्ही सीबीआयच्या चौकशीची मागणी केलेली नाही. कारण बिहार पोलिस या प्रकरणाची तपासणी करण्यास सक्षम असल्याचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा