साथीदाराच्या मदतीने वृद्धमहिलांना लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाचा पर्दाफाश

मुंबईच्या चेंबूर परिसरात साथीदारांच्या मदतीने वृद्ध महिलेस रात्रीच्या वेळी लुटणऱ्या रिक्षा चालकाचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सुबेदार लालजी बिंद असं या रिक्षा चालकाचं नाव आहे.

साथीदाराच्या मदतीने वृद्धमहिलांना लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाचा पर्दाफाश
SHARES

मुंबईच्या चेंबूर परिसरात साथीदारांच्या मदतीने वृद्ध महिलेस रात्रीच्या वेळी लुटणऱ्या रिक्षा चालकाचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सुबेदार लालजी बिंद असं या रिक्षा चालकाचं नाव आहे. लूट करून सुबेदार हा त्याच्या मूळगावी उत्तरप्रदेशला पळून गेला होता. दरम्यान, सुभेदारला न्यायालयाने १० मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलिस त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.


प्रवासादरम्यान लूट

चेंबूर परिसरात राहणाऱ्या कलावती पेडणकेर या २७ मार्च रोजी एका नातेवाईकांच्या लग्नासाठी चेंबूर जिमखाना येथे आल्या होत्या. त्यावेळी सोबत त्याचा मुलगा कौस्तुभ पेडणेकर आणि मित्र रोहन हा होता. मात्र कार्यक्रमात ते दोघेही थांबले. त्यामुळे कलावती रात्री रिक्षाने एकट्याच घरी निघाल्या होत्या. त्यावेळी रिक्षा चालक सुभेदारने कलावती यांना बोलण्यात गुंतवून रिक्षा वेगात कलिनाच्या दिशेने नेत होता. कुर्ला परिसरात सुभेदारचा एक मित्र अचानक कलावती यांच्या बाजूला येऊन बसला. त्यावेळी सुभेदारनं तो मित्र असून त्याला कलिना येथे सोडणार असल्याचं सांगितलं.

दरम्यानच्या प्रवासात दोघांनी कलावती यांना मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करून नका, चोर लक्ष्य करतील असं सांगत त्याच्याकडून हातीतल सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातील चेन काढून घेतली. काही अंतरावर सुभेदार हा काही महत्वाचं काम आलं असं सांगून त्याच्या साथीदाराला सोडण्यास सांगून निघून गेला. त्यानंतर काही अंतरावर वाकोलाच्या सिटीबेकरी जवळ सुभेदारच्या साथीदाराने गँस संपल्याचे कारण देत कलावती यांना सोडले. घरी आल्यानंत दोघांनी सोन्याचे दागिने परत न केल्याचं लक्षात आल्यानंतर कलावती यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


सीसीटीव्हीद्वारे शोध

त्यानुसार पोलिसांनी सीसीटिव्हीद्वारे रिक्षाचा नंबर मिळवत चेंबूर येथून राजेंद्रकुमार माळी याला ताब्यात घेतले. माळीच्या चौकशीत ही रिक्षा त्याचा चुलत भावाची असल्याचं सांगून दोघं शिफ्टनुसार चालवत असल्याचं सांगितले. तसंच दोघं २३ मार्च ते १ एप्रिलपर्यंत नातेवाईकाच्या लग्नासाठी गावी गेले असताना त्यांनी रिक्षा सुभेदारला चालवायला दिल्याचे सांगितलं. सुभेदारचा शोध घेतला असता तो त्याच्या मूळ गावी उत्तरप्रदेशला पळून गेला होता. त्यानुसार पोलिसांनी सुभेदारला २४ एप्रिल रोजी अटक करून मुंबईला आणले. पोलिसांसमोर त्याने सर्व गुन्ह्यांची कबूली दिली असून पोलिस त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत.




हेही वाचा -

'टकटक गँग'ची पुन्हा दहशत, शहिद अशोक कामटे यांच्या पत्नीची बॅग चोरीला

सावधान! नोकरी डाॅट काॅमवरून अर्ज करताय? तर हे वाचा...




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा