व्यसनाधीन तरुणांकडे खंडणी मागणाऱ्या पोलिसासह रिक्षा चालकाला अटक

झटपट पैसे कमवण्याच्या हेतूने या दोघांनी पश्चिम उपनगरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायझेरियनचा पाठलाग करून त्यांच्याजवळून ड्रग्ज घेणाऱ्यांना पकडून खंडणी मागायचे. मागील अनेक दिवसांपासून या दोघांनी अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला होता.

SHARE
मुंबईत दिवसेंदिवस अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायझेरियन तरुणांनी उच्छाद मांडला आहे. या तस्करांच्या मुसक्या वेळोवेळी पोलिस बांधत असल्याचे आपण ऐकले होते. मात्र, पोलिसच आता या तस्करांचा पाठलाग करून तरुणांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन लुबाडत असल्याचे पुढे आले आहे. नुकतंच गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांनी एका पोलिस काॅन्स्टेबलसह एका रिक्षा चालकाला अटक केली आहे.

मुंबईच्या (राखीव पोलिस दल) एल-३ मध्ये कार्यरत असलेले दहिबांवकर (५२) यांना या तस्करीत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी चालते. पोलिस सेवेच्या कार्यकाळात दहिबांवकर हे उपनगरात कार्यरत असल्याने त्यांना तस्करांचे सर्व अड्डे माहित होते. तर परिसरातील रिक्षा चालकांचाही आरोपींचा शोध घेण्यात मदत घ्यायचे. अशाच एका प्रकरणात त्यांची ओळख सांताक्रूझच्या लखन मंडल यांच्याशी झाली होती. 

झटपट पैसे कमवण्याच्या हेतूने या दोघांनी पश्चिम उपनगरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायझेरियनचा पाठलाग करून त्यांच्याजवळून ड्रग्ज घेणाऱ्यांना पकडून खंडणी मागायचे.  मागील अनेक दिवसांपासून या दोघांनी अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला होता. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठंनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा १२ कडे वर्ग केला. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सागर शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. 

 या दोघांनी ज्या - ज्या मुलांकडून अशा प्रकारे खंडणी घेतली त्या ठिकाणचे सीसीटिव्ही पोलिसांनी तपासले. त्यावेळी ड्रग्ज घेऊन येणाऱ्या नायझेरियनच्या रिक्षा मागोमाग हे दोन आरोपी यायचे. नायझेरियन तरुण ड्रग्ज देऊन निघून गेल्यानंतर दोन्ही आरोपी ड्रग्ज घेणाऱ्या मुलाला अडवून त्याला गुन्हे शाखेचे पोलिस असल्याचे सांगून एनडीपीएसच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी द्यायचे. अशाच एका प्रकरणात या दोघांनी एकाकडून तब्बल ३ लाख उकळल्याचे पुढे आले आहे. त्या शिवाय अनेकांना आतापर्यंत लुटल्याचेही तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सागर शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.हेही वाचा -

खाकीतली व्यक्ती ठरली देवदूत, निवडणूक अधिकाऱ्याचे वाचवले प्राण

अक्सा बीचवर बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
संबंधित विषय
ताज्या बातम्या