रिक्षा चालकाला बेदम मारहाण

 Govandi
रिक्षा चालकाला बेदम मारहाण

गोवंडी - आईचे रिक्षा चालकाशी अनैतिक संबध असल्याच्या रागातून एका तरुणाने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी चेंबूर परिसरात घडली. शरीफ शेख (24) असं या रिक्षा चालकाचं नाव असून तो ट्रॉम्बे परिसरात राहणारा आहे. बुधवारी रात्री तो चेंबूरच्या के स्टार मॉल परिसरात या महिलेसोबत बोलत असताना तीन आरोपींनी त्याला एका निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण केली. तसंच त्याच्याकडील दोन हजारांची रोख रक्कम देखील काढून घेतली. याबाबत रिक्षा चालकाने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Loading Comments