विजेच्या झटक्यामळे 'टपोरी' जखमी

 Kurla
विजेच्या झटक्यामळे 'टपोरी' जखमी

विद्याविहार - रेल्वे प्रवासात स्टंटबाजी करू नका, असं आवाहन रेल्वेसुद्धा वारंवार करते. पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. टपावरून प्रवास करण्याची स्टंटबाजी आणखी एका तरुणाला नडली आहे. लोकलच्या छतावरून प्रवास करताना एका तरुणाला ओव्हरहेड वायरमुळे जबरदस्त शॉक बसला आणि तो विद्याविहार आणि कुर्ला स्थानकांदरम्यान पडला. अमन खान असं त्याचं नाव आहे. पोलीस, हमाल आणि अन्य प्रवाशांनी अमनला कुर्ला स्थानकात आणलं आणि अॅम्ब्युलन्स  बोलावून लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आलं. अमनला मदत करणारा सहप्रवासी शकिल शेखनं सांगितलं की, कुर्ला येथून फोन केल्यानंंतर अॅम्ब्युलन्स अर्धा तास उशिरानं आली.

Loading Comments