• रेल्वेची ई-तिकीटे विकणाऱ्या बोगस एजेंटाला अटक
SHARE

अवैधरित्या रेल्वेची ई-तिकीटे विकणाऱ्या बोगस दलालाला रेल्वे पोलीस दलाने (आरपीएफ) अटक केली आहेे. वैलू मुरगन संकर नाडार (58) असे या बोगस दलालाचे नाव असून, त्याच्याकडून 87 हजार रुपयांची 37 ई-तिकीट जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर 2 रजिस्टर, 5 रेल्वे अर्ज, 1 सीपीयू आदी सामग्री देखील आरपीएफने जप्त केली आहे.

रेल्वे तिकिटांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या अनेक बोगस तिकीट दलालांचा सुळसुळाट झाल्याने अशा दलालांवर रेल्वे पोलीस आणि आयआरटीसीने कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र त्यानंतरही या बोगस तिकीट दलालांचा सुळसुळाट कमी झाला नव्हता.

अशातच डोंबिवली परिसरात अशाच प्रकारे रेल्वेच्या ई-तिकीटाची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती घाटकोपर रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी डोंबिवली येथे छापेमारी करत, या दलालला अटक केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या