...नाहीतर 'त्या' दोघांचा जीवच गेला असता!

एक दुर्घटना नायगाव रेल्वे स्थानकावर घडली. सुदैवाने यामध्ये प्रवासी महिला आणि तिच्या मुलाच्या जिविताला कोणताही धोका झाला नाही. आणि याला कारणीभूत ठरला तो घटनास्थळी उपस्थित असलेला रेल्वे सुरक्षा दलाचा हवालदार सुनिल कुमार नापा!

...नाहीतर 'त्या' दोघांचा जीवच गेला असता!
SHARES

मुंबईत धावत्या लोकलमध्ये चढताना अनेकदा अपघात झाल्याचं आपण ऐकतो. काही दुर्दैवी घटनांमध्ये अशा दुर्घटना संबंधित प्रवाशांच्या जिवावरही बेतल्याचं आपण पाहिलं आहे. अशीच एक दुर्घटना नायगाव रेल्वे स्थानकावर घडली. सुदैवाने यामध्ये प्रवासी महिला आणि तिच्या मुलाच्या जिविताला कोणताही धोका झाला नाही. आणि याला कारणीभूत ठरला तो घटनास्थळी उपस्थित असलेला रेल्वे सुरक्षा दलाचा हवालदार सुनिल कुमार नापा!


लोकल फलाटावरून निघाली आणि दुर्घटना घडली!

२ फेब्रुवारी रोजी रात्री घडलेली ही घटना. नायगाव रेल्वे स्थानकात सुनिल नापा ड्युटीवर होते. त्यावेळी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक-२वर मिरारोडला जाणारी स्लो लोकल आली होती. पुरेसा वेळ थांबल्यानंतर ही लोकल फलाटावरून निघाली. आणि तिथेच ही दुर्घटना घडली.


माय-लेक लोकलखाली अडकले...

लोकल फलाटावरून निघणार तोच एक महिला तिच्या मुलासह लोकल पकडण्यासाठी धावत आले. तोपर्यंत लोकल सुरू झाली होती. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात हे दोघेही खाली पडले आणि फलाट आणि लोकलच्या मधल्या जागेत अडकले. त्याच वेळी कर्तव्यावरील सुनिल नापा यांनी त्या दोघांना वर खेचले. तर इतर प्रवासीही सुनिल यांच्या मदतीसाठी धावले.


प्रसंगावधान आणि कार्यतत्परता!

सुनिल नापा यांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि इतर प्रवाशांनी माणुसकीच्या नात्याने दाखवलेली तत्परता यामुळे ही महिला आणि तिचा मुलगा यांचे प्राण वाचले. नापा यांच्या या कामगिरीमुळे उपस्थित प्रवासी आणि रेल्वे पोलिस दलातही त्यांचं कौतुक होत आहे!



हेही वाचा

गजबलेलं दादर स्थानक अन्  लाेंबकळणारा मृतदेह


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा