• प्रसंगावधानामुळे वाचले 'त्या' महिलेचे प्राण!
SHARE

नालासोपारा उपनगरीय रेल्वे स्टेशनच्या रुळावर आत्महत्या करण्यासाठी आली होती. मात्र आरपीएफच्या जवानांच्या प्रसंगावधानामुळे त्या महिलेचे प्राण वाचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश कुमार आणि महिला हवालदार प्रिंयका माने फलाट क्रमांक एकवर गस्तीवर असताना समा बान दाहूद शेख (35) नावाची महिला आत्महत्या करण्याच्या हेतूने रेल्वे रुळावर खूप वेळापासून उभी होती. गस्तीवर असलेल्या पोलिसांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी महिलेची समजूत काढत तिला नालासोपारा स्टेशनवरील आर. पी. एफ. कार्यालयात आणले.

पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केली असता ती जोगेश्वरी (पूर्व) येथील मेघवाडी परिसरातील रहिवासी असल्याते समजले. घरच्यांशी झालेल्या वादातून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. महिलेने तिचा भाऊ मोहम्मद शेखचा मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला. त्यानुसार पोलिसांनी संपर्क करून महिलेल्या भावाला नालासोपाऱ्यातील आरपीएफ कार्यालयात बोलावले. आपल्या बहिणीला मानसिक आजार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना दिली. सर्व जवाब नोंदवल्यानंतर आरपीएफ इंचार्ज आर. के. राय यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी एक लिखित पावती देऊन समा आणि तिच्या भावाला सोडले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या